कोकिसरे गावचे बावडेकर पुराणिक दारिद्रय आणि दुःखाने अतिशय पिडले होते म्हणून एके दिवशी ते त्यांचा गाव सोडून बायको व म्हाताऱ्या आईला घेऊन श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन येथेच राहण्याचा त्यांनी विचार केला आई बायको आणि ते स्वःत असे तिघांचे त्यांनी अक्कलकोटातच बिर्हाड केले माधुकरी मागून ते तिघांची गुजराण करु लागले श्री स्वामी समर्थांच्या दर्शन सेवेने त्यांचे समाधान होईना श्री स्वामी समर्थांपुढे रोज पुराण सांगता यावे म्हणून त्यांनी भागवताची पोथी मिळवून नमन झाल्यावर श्लोक वाचनास आरंभ केला तो श्री स्वामी महाराज हळू हळू रागावू लागले एक श्लोक पूर्ण होऊन दुसऱ्या श्लोकांचा आरंभ होताच श्री स्वामी समर्थ बावडेकर पुराणिकावर कडाडलेच बंद कर भोसडीच्या तुला कोणी वाचावयास सांगितले पुराण बंद केल्यामुळे पुराणिकबुवा खिन्न होऊन त्यांच्या बिर्हाडी गेले दुसऱ्या दिवशी तिसरे प्रहरी पुराणिकबुवा पुन्हा आले श्री स्वामींचे दर्शन घेऊन श्लोकास आरंभ करताच श्री स्वामींनी शिव्या सुरू केल्या मादरचोदा निकल जाव शिपायांनी सांगितले की महाराज शिव्या देत आहेत पुराण बंद करा त्यांनी ते बंद केले तिसरे दिवशीही तोच थाट पुराणिकबुवाही हट्टास पेटले त्यांनी असा नियम केला की ज्या दिवशी श्री स्वामींच्या शिव्या बंद होतील त्या दिवशी श्री स्वामी समर्थांची कृपा झाली असे समजायचे त्या दिवशी पाहिजे असल्यास मी पुराण बंद करीन तो पर्यंत बंद करणार नाही असा पुराणिकबुवांचा दृढ निश्चय झाला पुढे रोज पुराणाचा आणि रोज शिव्यांचा क्रम सुरू होता असे होता होता सहा महिने झाले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

वरील कथा भागात दारिद्रयाने गांजलेला आणि दुःखाने पिचलेला बाबडेकर पुराणिक त्याचा श्री स्वामींपुढे पुराण सांगण्याचा दृढ निश्चय श्री स्वामींना त्याचीही कृती आणि पुस्तकी पांडित्य फोलकटपणाचे आणि निरर्थक वाटले म्हणूनच ते त्यांच्यावर शिव्याचा भडिमार करुन त्याचे पुराण बंद पाडीत अखेरच्या चरणात बुवासुद्धा जाद्दीला पेटले ज्या दिवशी श्री स्वामींच्या शिव्या बंद होतील त्या दिवशी श्री स्वामी समर्थांची कृपा झाली असे समजायचे त्या दिवशी पाहिजे असल्यास मी पुराण बंद करीन तो पर्यंत बंद करणार नाही बुवांच्या या उदगारावरुन त्यांचा निश्चयात्मक विवेकच जागा झाला श्री स्वामींच्या त्या शिव्या खाऊनही दारिद्रयाने गांजलेला दुःखाने पिचलेला तो माधुकरी मागून आई बायको आणि स्वतःची करीत असलेली दररोजची गुजराण हे सर्व बुवाने सहा महिने केले बुवांचा हा दृढ निश्चय सर्वच थक्क करणारे आहे यात त्यांची जबरदस्त स्वामी निष्ठा वाट्यास आलेले प्राक्तन प्रारब्ध दृढ निश्चयाने भोगण्यास सज्ज झालेले पुराणिकबुवा निश्चितच धीरोदात्त वाटतात अध्यात्मात अथवा उपासनेत आपल्या सदगुरुप्रती असाच दृढ निश्चयीपणा असावा लागतो हा येथे अर्थबोध होतो.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या