ठाकूरदासबुवा गाणगापुरी येऊन दत्तपादुकांची सेवा करु लागले दत्तपादुकांची अखेरची पूजा करतेवेळी बुवांनी पादुकांवर कस्तुरी अर्पण करण्याच्या हेतूने उत्तम कस्तुरी बरोबर आणली होती पादुकांची यथासांग पूजा केली मात्र कस्तुरी अर्पण करण्याच्या बुवांना विसर पडला ब्राम्हण भोजन कीर्तन झाल्यावर श्रीदत्तप्रभूंकडे काशीस जाण्याची बुवांनी आज्ञा मागितली त्याच रात्री बुवास दृष्टांत झाला की अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यावे म्हणजे कुष्ठ रोगापासून मुक्त होशील दृष्टांतानुसार बुवा अक्कलकोटास आले श्री स्वामींचे चरणी मस्तक ठेवून बुवांनी दर्शन घेतले श्री स्वामी बुवांकडे पाहू लागले हमारी कस्तुरी अभी के अभी लाव ठाकूरदासबुवास श्रीदत्तपादुकांवर अर्पण करण्यासाठी आणलेल्या कस्तुरीचे स्मरण झाले आणि श्री स्वामी समर्थांनी त्याची आठवण करुन दिली त्यावरुन बुवास श्री स्वामींच्या अंतःसाक्षित्वाबद्दल खात्री पटली ,


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

ठाकूरदासबुवा अक्कलकोटात चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या दिव्य तेजस्वी मनोहारी श्री स्वामींच्या दर्शनाने भारावून गेले त्या भारावलेल्या अवस्थेतच ते गाणगापूरांस येऊन दत्तप्रभूंच्या सेवेत मग्न झाले होते त्यांना त्यांच्या सर्वांगावर उमटलेल्या कोडाची त्या विद्रूपपणाची लाज वाटत होती म्हणून सर्वांपासून दूर तोंड लपविण्याच्या हेतूने काशीस जाण्याची बुवांनी दत्तप्रभूंकडे परवानगी मागितली तेव्हा त्यांना अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा दृष्टान्त झाला त्यानुसार बुवा अक्कलकोटला आले बुवास समोर बघताच श्री स्वामी समर्थ म्हणाले हमारी कस्तुरी अभी के अभी लाव ठाकूरदास बुवास दत्तपादुकांकरिता आणलेल्या परंतु अर्पण करण्याची राहून गेलेल्या कस्तुरीचे स्मरण झाले दत्तप्रभू आणि श्री स्वामी समर्थ एकच असल्याचा प्रत्यय बुवांना आला बुवांनी कस्तुरी श्री स्वामींस अर्पण केली श्री स्वामींनी ती कस्तुरी लहान मुलांना सहजपणे देऊन टाकली श्री स्वामी एका वेश्येच्या घरी बसले होते याचेही बुवास नवल वाटले या लीलेवरुन श्री स्वामी समर्थ आणि दत्तप्रभू एकच असल्याचा बोध होतो अर्पित केलेली वस्तू कितीही किंमती असो ती सहज वाटून देण्याचा निरिच्छपणा श्री स्वामींत ओतप्रोत भरल्याचेही प्रतीत होते लोकप्रवादाची कोणतीही पर्वा अथवा फिकीर श्री स्वामीस नव्हती त्यामुळेच त्यांना कोणतेही ठिकाण वर्ज्य नव्हते अशी ही लीला करुन श्री स्वामींनी बुवांसारख्या कीर्तन प्रवचन पूजा अर्चा करणाऱ्याच्या मनातील अनेक रुढ कल्पनांना धक्के दिले बुवांच्या मनातील विधिनिषेधाची जळमटे कोळीष्टके काढून टाकली आपण अवधूत स्वेच्छारी विमुक्त स्वैरविहारी परमहंस दत्तप्रभूंचेच स्वरुप असल्याचे श्री स्वामींनी दाखवून दिले .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या