काशी क्षेत्री राहणाऱ्या काशीकर स्वामींनी मीमांसा न्यायशास्त्र वेदान्त मंत्रशास्त्र इ.शास्त्रांचे यथार्थ अध्ययन केलेले होते त्यांची बुद्धी विलक्षण तीव्र होती ते स्वभावाने निःस्पृह होते त्यांना चार पाच भाषांचे ज्ञान होते वामनमूर्ती तालीमबाज शरीर आणि सतेजपणा असे त्यांचे स्वरुप होते त्यांनी जगन्नाथ क्षेत्री संन्यास घेतला होता त्यांना आत्मानात्म विचारात आणि योग शास्त्रात काही शंका होत्या या शंका समाधानासाठी ते पुष्कळ क्षेत्रातील संन्यासी विद्वान योगी आदि लोकांकडे गेले पण त्यांचे शंकासमाधान झाले नाही त्यासाठी ते बर्याच तीर्थयात्रा करीत फिरले असेच ते रामेश्वराच्या यात्रेस जाऊन परत येत असताना मलबारात (केरळमध्ये) त्यांना एका रात्री दृष्टांत झाला की तू अक्कलकोटास ये जाग आल्यावर अक्कलकोटचा शोध घेत घेत ते शके १७९९ (इ.स.१८७७) पौष महिन्याच्या वद्यपक्षात सकाळी ११ वाजता अक्कलकोटास आले श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेताच विद्वान काशीकर स्वामींच्या अंतःकरणात प्रचंड प्रेम दाटून आले त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्र् वाहू लागले या स्थितीत ते चार घटका स्तब्ध उभे राहिले नंतर त्यांनी श्री स्वामी समर्थांस साष्टांग नमस्कार घालून त्यांच्या पायावर डोके ठेवले नंतर खाली बसले पुढे ते एक महिना श्री स्वामी समर्थां जवळ होते जवळच असलेल्या मैंदर्गी गावी दहा वीस सेवेकर्यांसह एके दिवशी श्री स्वामी समर्थ गेले त्या गावापासून एक मैलावर नाथांचा मठ आहे तेथे सकाळी आठ वाजेच्या दरम्यान श्री स्वामी बसलेले असताना काशीकर स्वामी स्नान संध्या आटोपून श्री स्वामींच्या दर्शनास तेथे आले दर्शन घेऊन ते उभे राहताच तेव्हा त्यांना अदभुत चमत्कार दृष्टीस पडला तो ते जाणोत परंतु जवळच्या मंडळीस इतकेच दिसले की स्वामी असे का करतात असा दंडवत घालावे उभे राहवे पुन्हा दंडवत घालावे पुन्हा हात जोडून उभे राहवे असे दहा पाचवेळा झाले काशीकर स्वामींचे अंग कापत होते त्यांना घाम सुटला होता त्यांच्या डोळ्यातून सारखे पाणी चालले होते ते दीन मुद्रेने श्री स्वामी समर्थांकडे पाहत होते असा खेळ दोन घटकांपावेतो झाला श्री स्वामी समर्थ तेव्हा चार घटका स्तब्ध बसलेले होते दुसऱ्या दिवशी काशीकर स्वामींनी दत्तात्रयबुवा पुराणिकांकडे कबुल केले की त्यांच्या सर्व शंकांचे समाधान झाले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांचे सामर्थ्य अवतारित्व आणि देवत्व कसे वादातीत आहे याचा बोध करुन देणारी ही लीला आहे काशीकर स्वामीं त्यांच्या प्रखर तपोबलाने शास्त्रीय दृष्ट्या ज्या पायरीस (अवस्थेस) जाऊन पोहचले होते तिच्या पलीकडे जाण्यास त्यांना मार्ग दाखवणारा त्यांच्या मनातील गूढ अगम्य शंकांचे निरसन करणारा या भूमंडळावर त्यांना कुणीच न भेटल्यामुळे तू अक्कलकोटास ये असा त्यांना स्वप्न दृष्टांत देऊन श्री स्वामींनी आपल्यापाशी बोलावले श्री स्वामींनी ही लीला अक्कलकोटात बसून केली एक प्रकारे श्री स्वामींनी काशीकर स्वामींच्या देहबुद्धीवर आणि ज्ञानबुद्धीवर ज्ञानबोधाची शस्त्रक्रिया केली श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने त्यांच्या झालेल्या स्थितीचे वर्णन लीलेत आहेच मैंदर्गीच्या नाथांच्या मठातील श्री स्वामी समर्थांची काशीकर स्वामींवरील किमया स्तिमित करणारी आहे एक चकार शब्दही न बोलता श्री स्वामींनी काशीकर स्वामींस प्रचिती दिली ते ज्या वे.शा.सं.दत्तात्रय बुवा पुराणिक या विद्वानांच्या घरी उतरले होते त्यांच्याजवळ काशीकर स्वामींनी प्रांजळपणे एवढेच सांगितले माझ्या सर्व शंका दूर झाल्या यातच सर्व काही आले त्या शंका निरसानासाठी अक्कलकोटला श्री स्वामी भेटीस येण्याअगोदर त्यांनी किती यातायात केली याचेही वर्णन लीलेत आले आहे श्री स्वामींनी एकही शब्द न बोलता योगशास्त्रातील गूढ रहस्ये (त्यास दंडवत घालावे उभे राहवे पुन्हा हात जोडून उभे राहवे असे पाच दहा वेळा झाले हे सर्व तेथे उपस्थित असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवेकर्यांनी पाहिले) या यौगिक क्रियेतून श्री स्वामींनी काशीकरास योगशास्त्रातील गूढ रहस्ये उकलून दाखविली त्यांचे शंकासमाधान केले कुठल्याही प्रकारच्या पांडित्याचा ज्ञानाचा आव न आणता शाब्दिक भाषेचा पिसारा न उभारता नव्हे नव्हे एक शब्दही न बोलता काशीकरासारख्या विद्वानाच्या शंकांचे निरसन करण्याचे श्री स्वामी समर्थांचे सामर्थ्य आपणास काय बोध देते याचा विचार आपण सर्वांनीच गांभीर्याने करावयाचा आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या