हैद्राबादेस विठ्ठलराव म्हणून मामलेदार होते त्यांच्या वाईट कृत्यामुळे त्यास मामलतीच्या कामावरुन दूर केले मोगल सरकार अटक करणार या भीतीने ते श्री स्वामी समर्थांकडे रक्षणार्थ अक्कलकोटला आले श्री स्वामींपुढे प्रार्थनेसाठी हात जोडून विठ्ठलराव उभे राहिले अतिशय संतप्त व तप्त मुद्रेने श्री स्वामी समर्थ विठ्ठलरावास म्हणाले हांसत कर्म करावे भोगावे तेंचि रडत परिणामी काय माजलास काय रे दुसऱ्यांच्या बायका द्रव्य पाहिजे का आमच्याकडे का आलास चालता हो तुझ्या बापाचे नोकर आहोत काय हे कठोर शब्द ऐकून विठ्ठलरावाने श्री स्वामींस साष्टांग नमस्कार घालून अतिशय कळवळून प्रार्थना केली की महाराज अपराधाची क्षमा करा आजपासून मी अशी कृत्ये करणार नाही महाराज शरणागताचे रक्षण करा आपल्यावाचून या जगात माझा वाली कोणी नाही असे म्हणून तो श्री स्वामी चरणांवर गडबडा लोळू लागला दयाघन श्री स्वामींस त्याची कीव येऊन ते म्हणाले जा तुझे अपराध क्षमा केले आहे यापुढे सावधगिरीने वाग श्री स्वामींना साष्टांग नमस्कार घालून त्यांच्या नामाचा जयजयकार करीत तो हैद्राबादेस गेला पुढे तो दोषमुक्त होऊन त्यास त्याची मामलतीची जागाही मिळाली .
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
पत प्रतिष्ठा सत्ता असताना अनेक माणसे हैद्राबादच्या विठ्ठलरावासारखे वागतात त्यांना कशाचे म्हणून भान राहात नाही त्या उन्मत्त अवस्थेत त्यांना सर्वच कःपदार्थ वाटतात परमेश्वराचाही विसर पडतो अशीच अवस्था मामलेदार असलेल्या विठ्ठलरावाची झाली होती त्याला कामावरुन दूर करण्यात आले आणि अटक होण्याची शक्यता निर्माण झाली वाईट कृत्याचे असे फळ अंतिमतः मिळतच असते हा लीलेचा प्रमुख बोध आहे संकटात देवाचीच आठवण येते म्हणून त्यास अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचीच आठवण झाली तेच तारणहार आहेत याची त्याला तीव्रतेने जाणीव झाली हाही येथील महत्त्वाचा बोध आहे श्री स्वामींनी ज्या भाषेत आणि ज्या कारणासाठी विठ्ठलरावाला खडसावले त्यातून आपण योग्य तो बोध घ्यावा पश्चात्ताप झाल्यावर परमेश्वरी कृपा झाल्यावर त्यास विसरू नये संकटात सुख दुःखात सदैव त्याचे स्मरण करीत राहावे तो साक्षीला आहे असे समजून वर्तन असावे हेच या लीलेतून आपण शिकावे .
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या