गुरुप्रतिपदेच्या उत्सवात मल्लू गवळ्याने दामदुप्पट भाव घेऊन दूध विकले दुप्पट किंमत घेऊनसुध्दा त्याने दुधात पाणी घातले त्यामुळे सर्व दूध नासले सेवेकर्यांनी श्री स्वामी समर्थांस सांगितले महाराज मल्लू गवळ्याने दुप्पट किंमत घेऊनसुध्दा दुधात पाणी घालून दिले त्यामुळे सर्व दूध नासून गेले आता काय करावे असे ते श्री स्वामींकडे तक्रार करीत आहेत तोच तिकडे श्री स्वामींनी अशी काही लीला केली की मल्लू गवळ्याच्या १५-२० म्हशी स्तनास (आचळास) हाल लावू देईनात त्यांच्या स्तनातून रक्ताच्या धारा लागल्या हे सर्व पाहून मल्लू गवळी भयभीत झाला त्याने पुष्कळ औषधोपचार केले परंतु गुण काही येईना त्याला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला श्री स्वामी समर्थांकडे जाऊन त्याने त्यांचे पाय धरले आणि रडत रडत सांगू लागला महाराज अपराधाची क्षमा करा आजपासून अशी लबाडी (दुधात पाणी घालण्याची व दामदुप्पट किंमतीने विकण्याची) कधीही करणार नाही हे ऐकून श्री स्वामी हसून म्हणाले जा होईल बरे मल्लू गवळ्याने श्री स्वामींचे चरणतीर्थ व अंगारा म्हशींच्या आचळास लावताच त्या पूर्ववत दूध देऊ लागल्या पुढे तो दररोज एकशेर दूध नैवेद्याकरिता आणून देऊ लागला .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

ह्या लीलेतील मल्लू गवळ्यासारखे दुधातच नव्हे तर अनेक वस्तूत भेसळ करुन दामदुप्पट अथवा चढ्या भावाने वस्तू विकणारे वस्तूंच्या वजनातही हात मारणारे अनेक व्यापारी दुकानदार आहेत मोह अतिरिक्त लालसा हे त्याचे मूळ आहे परंतु हेच अंतिमत हानिकारक प्रसंगी प्राणघातकही ठरते याचे भान मात्र त्या व्यक्तीस राहात नाही जेव्हा हानी अथवा नुकसानीने भानावर येतो तेव्हा फार उशीर झालेला असतो मोहातुर झालेल्याचे भान हरपलेले असते बुद्धी भ्रमिष्ट झालेली असते सारासार विवेक सुटलेला असतो आज व्यवहारात  व्यापारात जो खोटाडेपणा आला आहे जी वृत्ती व प्रवृत्ती वाढत आहे ती मल्लू गवळ्यासारखीच आहे निदान त्याला श्री स्वामी समर्थ कृपेने अंतिमत उमगले तरी परंतु सध्या अवती भवती दिवसाढवळ्या राजरोस जे घोटाळे भ्रष्टाचार घडत आहेत त्याचे काय सर्वसामान्यांची लुबाडणूक छळवणूक आणि पिळवणूक कशी थांबणार अशा या स्थितीत अनेक मल्लू गवळ्यांचा सद् विवेक  केव्हा आणि कसा जागा होणार ते केव्हा सुधारणार इतरांचे काही असो निदान आपण आपल्यापासून सुधाण्याची सुरुवात करु या जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी या संत तुकारामांच्या उक्तीने वागू या या लीलेतून हाच बोध घेऊ या.

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या