एके दिवशी श्री स्वामी समर्थ महारवाड्यात हाडकाच्या ढिगाला टेकून बसले होते पुष्कळ लोक श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास येत जात होते दारिद्रयाने पिडलेला एक ब्राम्हण द्रव्यप्राप्तीच्या इच्छेने अक्कलकोटात आला होता जेव्हा श्री स्वामींच्या दर्शनास महारवाड्यात गेला तेव्हा ते हाडकाबरोबर हसत खेळत होते त्या द्रव्येच्छू ब्राम्हणास महाराज म्हणाले तुम्हाला पाहिजे असेल तेवढे यातून घ्या त्यास संशय येऊन तो म्हणू लागला या हाडकांना कसे शिवावे जवळच उभा असलेला सेवेकरी त्यास म्हणाला तुमच्या देहात काय आहे हाडे आहेत की सोन्याचे तुकडे त्या द्रव्येच्छू ब्राम्हणाने श्री स्वामी आज्ञा मान्य करुन लाजत लाजत त्या हाडांच्या ढिगार्यातून दोन चार हाडाचे तुकडे एका फडक्यात बांधून घेतले ते गाठोडे बिर्याडी नेऊन एका बाजूस ठेवले दुसऱ्या दिवशी ते गाठोडे उचलून पाहतो तो ते त्याला जड लागू लागले गाठोडे सोडून पाहतो तर हाडाऐवजी सगळे सोनेच होते तो द्रव्येच्छू ब्राम्हण म्हणाला मला काय ठाऊक मी पुष्कळ हाडे घेतली असती परंतु आपल्याला जितके मिळाणार तितकेच मिळाले प्राक्तना शिवाय जास्त मिळेल कोठून असो पण तेवढ्याने माझा कार्यभाग झाला श्री स्वामींची पूजाअर्चा करुन तो त्याच्या गावी गेला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

ह्या लीलेत श्री स्वामी समर्थ महारवाड्यात म्हणजे शूद्रांच्या वस्तीत असल्याचा उल्लेख आला आहे परंतु खरे तर जो असंस्कारित असतो तो शूद्र असतो त्यावरुन आपण कोण आहोत हा विचार ज्याचे त्याने करावयाचा आहे श्री स्वामी महाराज हाडकाच्या ढिगाला टेकून बसले होते आणि हाडकाबरोबर हसत खेळत होते जणू त्यांना असेच सूचित करायचे होते अरे प्रापंचिकांनो आयुष्याचे मोल ते किती ते चार दिवसाचे नाशिवंत असणारे आहे कशासाठी इतका भेदा भेद श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात असंख्य लीला द्वारे प्रबोधित करीत होते पण बहुसंख्य त्या लीलानाट्याकडे गांभिर्याने न पाहता चमत्कार म्हणून पाहत होते अजूनही बहुतेकांचा दृष्टिकोन तोच आहे बहुतेक संसार प्रपंचातच गुरफटलेले विवंचनेत बुडालेले आपल्या अडचणी सोडवून घ्याव्यात आणि चालते व्हावे एवढेच त्यांचे उद्दिष्ट असते अशा त्या गर्दीत एक द्रव्येच्छू होता श्री स्वामी समर्थांचे असे महारवाड्यात येऊन हाडाच्या ढिगाला टेकून बसणे आणि हाडांशी हसणे खेळणे त्यास रुचले नाही त्याच्या मनात विटाळ होईल असा संशय आला अंतर्ज्ञानी श्री स्वामी त्या द्रव्येच्छू ब्राम्हणास म्हणाले तुम्हाला पाहिजे असेल तेवढे यातून घ्या त्या अज्ञानी जीवास काय आणि कोठून कल्पना असणार की घेतलेल्या हाडाचे सोने होणार आहे म्हणून श्री स्वामींनी सेवेकर्यांच्या तोंडून त्याच्या मनात निर्माण झालेल्या हाडकांना कसे शिवावे या शंका आणि संशयाला रोख ठोक उत्तर दिले आणि ते वास्तव वादीही आहे तुमच्या देहात काय आहे हाडे आहे की सोन्याचे तुकडे आहेत म्हणजे सोवळ्या ओवळ्याचे आणि शंका कुशंकांचे व संशयाचे अवास्तव कल्लोळ मनात निर्माण करण्याचे काहीच कारण नाही या लीलाकथेत अखेरीस त्या ब्राम्हणास त्याची चूक समजली पण त्यास उशीर झाला होता त्यासाठी उपासनेत विवेक हवा अवास्तव संशय शंका कुशंका अतिरिक्त सोवळ्या ओवळ्याचे अवडंबर नसावे शुद्ध भाव भक्ती असावी जे घडेल घडते आहे ते प्राक्तना नुसार निरपेक्ष सेवा हाच इथला प्रबोध आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या