अक्कलकोटला दरवर्षी जाणारा मंगळवेढ्याचा बसाप्पा तेली आता म्हातारा झाला होता त्याची बायकोही वारली होती त्याच्या तिन्ही मुलांसह एकदा तो श्री स्वामी समर्थांकडे आला होता नेमक्या ह्याच वेळी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने एक ब्राम्हण स्त्री श्री स्वामींची सेवा करण्यासाठी तेथे आली होती तिच्या तोंडाकडे पाहून श्री स्वामी समर्थ म्हणाले लिंबे इकडे ये हा तेली (तेथे आलेला बसाप्पा) तुझा पूर्व जन्मीचा नवरा आहे तुझेच पोटचे हे तिन्ही मुलगे आहेत त्यांना जवळ घे तेव्हा चमत्कार घडला की ते तिघेही जण आई आई म्हणून त्या स्त्रीशेजारी जाऊन बसले वृद्ध तेल्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले त्या  बाईच्याही मनात त्या मुलाबद्दल प्रेम उत्पन्न झाले नंतर श्री स्वामींनी त्या बाईस आज्ञा केली अगं लिंबे तू ह्या तेल्याबरोबर जाऊन त्याच्या घरात पश्चिमेच्या बाजूस रंगीत खांबाखाली तुझ्या हाताने द्रव्याने भरलेला हंडा पुरलेला आहे तो याला निर्लोभीपणाने दे म्हणजे त्याचेही दारिद्रय जाईल आणि तुलाही पुत्र होईल श्री स्वामींच्या आज्ञेनुसार अक्कलकोटाहून चोवीस कोस लांब असलेल्या त्या तेल्याच्या घरी ते सर्व आले श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे सुवर्ण मोहरांचा हंडा त्या खांबाखाली सापडला तेल्याचे दारिद्रयही गेले ती बाई काही दिवस श्री स्वामींजवळ राहून गावी कोकणात आली त्याच वर्षी त्या बाईस पुत्रप्राप्ती झाली .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

या अगोदर या लीलाकथेत त्याच्या वासनालिप्त पत्नीचा उल्लेख आला आहे ती लोभी असल्यामुळे तिने बसाप्पाला मिळालेल्या धनातील काही भाग पुरुन ठेवलेला असेल त्यामुळे त्यात तिची सुप्त इच्छा गुंतलेली असेल तेच या जन्मी त्या ब्राम्हण स्त्रीस पुत्र होण्यास अडथळा ठरत असेल तिची वासनेत गुंतलेली आशा आकांक्षा या जन्मीही विघ्नरुप ठरत होती श्री स्वामींच्या अफाट सामर्थ्यामुळे येथे नातेसंबंधाचा उलगडा झाला श्री स्वामींनी सर्व खाणाखुणा समजावून सांगितल्यावर हे सर्व घडले तेव्हाच खर्या अर्थाने ते सर्व मुक्त झाले धन संपदा जमीन जुमला इ.मध्ये वासनामयता नसावी ती भक्तीतून मिळणाऱ्या फलप्राप्तीत अनेकदा अडथळा ठरते हे येथे बोधित होते .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या