अक्कलकोटनजीक एक कोसावर ममदाबाद म्हणून बोरी नदीच्या काठी एक गाव आहे त्या गावी गोविंदपंत कुलकर्णी नावाचे ऋग्वेदी ब्राम्हण राहत असत त्यास भोजन केल्यावर पोटात अग्नी झाल्यासारखे होऊन खाल्लेले अन्न ओकून पडत असे या व्याधीने त्रासून ते गाणगापुरास गेले तेथे त्यांनी दत्तप्रभूची पुष्कळ सेवा केली तेथे त्यांना दृष्टांत झाला की तुला परब्रम्हाचे दर्शन झाल्यास तू व्याधीपासून मुक्त होशील परब्रम्ह या कलियुगात कोठे दिसेल असा विचार करीत असता बाबा भटास गोविंदपंत स्वप्न दृष्टांत सांगून म्हणाले मी कुटुंबवत्सल ब्राम्हण आहे मला मुमुक्षत्व वैराग्य वगैरे काही नाही असे असता मला परब्रम्ह दर्शन कसे होईल हे कृपाकरुन सांगा तेव्हा बाबा भटाने दत्तप्रभूस प्रार्थना केल्यावर गोविंदपंताना दृष्टांत झाला की ते परब्रम्ह अक्कलकोटी आहेत तेथे जाऊन घरं झाडावी म्हणजे ते प्राप्त होईल हे स्वप्न पाहून पंत जागे झाले दुसरे दिवशी ते अक्कलकोटी आले पंतांनी श्री स्वामींचे दर्शन घेतल्यावर नमस्कार करुन ते उभे राहिले तोच समर्थ म्हणाले गोमूत्र आणि शेण सात दिवस खा म्हणजे व्याधीपासून मुक्त होशील तू वृद्ध गाईस गांजलेस म्हणून हा शूळ उत्पन्न झाला हे ऐकून पंत म्हणाले महाराज आपण पूर्ण शिवअवतार असून आमच्यासारख्या मूढ जनांचा उद्धार करण्यासाठी आपला अवतार झाला आहे हे माझ्या पूर्ण अनुभवास आले असे म्हणून पंतांनी श्री स्वामी चरणावर साष्टांग नमस्कार घातला सात दिवस पंतांनी गोमूत्र शेण घेताच त्यांची व्याधी निःशेष नाहीशी झाली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाकथेतील गोविंदपंतास पोटदुखीचा आजार होता खाल्लेले अन्न ओकून पडत असे या व्याधीने ते त्रस्त झाले होते त्यावेळी वैद्यकशास्त्र आताच्यासारखे प्रगत नव्हते त्याचे सारे उपायच खुंटल्यावर ते गाणगापुरास दत्तप्रभूंच्या सेवेत गेले दत्तप्रभूंची सेवा केल्यावर परब्रम्हाच्या दर्शनानेच पोटदुखीच्या व्याधी पासून मुक्तता होईल असा दत्तप्रभूंचा गोविंदपंतास दृष्टांत झाला असे परब्रम्ह कोठे भेटावे या विचारात तो असतानाच त्याला अक्कलकोटी असे परब्रम्ह भेटेल असे सूचित करण्यात आले त्याप्रमाणे ते अक्कलकोटला आले येथे येताच श्री स्वामी समर्थांनी त्यास सात दिवस शेण आणि गोमूत्र घेण्यास सांगितले तसे करताच गोविंदपंत व्याधीमुक्त झाले आधुनिकतेचा दृष्टिकोन असलेल्यांना पुनर्जन्माची प्रारब्धाची संचित पाप पुण्याची क्रियामान फलाची कर्म सिद्धांताची संकल्पना मान्य होत नाही पण एकाच आई वडिलांची मुले सारख्याच बुद्धयांकाची सारख्याच प्रवृत्ती प्रकृती स्वभावाची का होत नाहीत जुळी मुले मुलीही भिन्न प्रकृती प्रवृत्ती स्वभावाची का आढळतात अशा अनाकलनीय प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पुनर्जन्म आणि प्रारब्ध इ.मानावेच लागते ते सारे आठवत नाही म्हणून ते नाहीच असे म्हणणे अथवा न मानणे शहाणपणाचे नसते संचित अथवा प्रारब्ध भोगून कमी करणे अथवा दृष्कृत्य कुकर्म अनीतीने वागून त्यात भर न घालणे हे प्रत्येक व्यक्तीच्या हाती असते म्हणून प्रारब्ध विनातक्रार आणि धीराने भोगणे सोसणे हेच खरे प्रगल्भतेचे आणि शहाणपणाचे आहे हे उपासनेने साध्य होते ही उपासना म्हणजे तरी काय रुढीबद्ध झापडबंद पद्धतीने केली जाणारी कालबाह्य कर्मकांडे यास फाटा देणे कोणत्याही प्रकारच्या अंधःश्रद्धेच्या आहारी न जाणे दया क्षमा शांती आणि करुणा ह्या दैवी तत्त्वाच्या अनुषंगाने आचार विचार आणि व्यवहार करणे सत्यम शिवम सुंदरम या विश्व व्यापक तत्त्वावर प्रखर विश्वास ठेवल्यास संचित प्रारब्ध दूषित क्रियाकर्म आदी क्षीण होतात प्रसंगी प्रतिकुलतेत अनुकूलता निर्माण होते या लीला कथेत गोविंदपंताचे संचित प्रारब्ध व दूषित क्रियामान कर्म नष्ट करण्यासाठी स्वामींनी गोविंद पंतास सात दिवस गोमूत्र व शेण खाण्यास सांगितले त्यांच्या या सांगण्यावरुन असाच बोध होतो की गोविंदपंताचे संचित प्रारब्ध व मागील क्रिया कर्ममान फार दूषित होते त्याच्या त्यावेळच्या स्थितीत त्याला लाभ होण्यासाठी त्याने प्रायश्चित्त घेणे क्रमप्राप्त होते प्रायश्चित्ताने कुणाचीही चित्तशुद्धी होते हे सर्व ज्ञात आहे यातूनच भावीकाळ चांगला प्राप्त होतो जशी गोविंदपंताची पोटदुखीची व्याधी निःशेष नाहीशी झाली.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या