श्री स्वामी समर्थ निघून गेल्यामुळे चिंतोपंत टोळ हवालदिल झाले घोडा भरधाव दौडवून टोळ अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थांना खंडोबाचे देवळात पाहून त्यांना मोठा आनंद झाला विनम्रपणे सत्वर घोड्यावरुन खाली उतरुन त्यांनी श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेतले व विनंती केली की महाराजांनी आपल्या घरी चलावे त्यावर महाराजांनी उत्तर दिले आमचे घर निराळे आहे चिंतोपंत टोळांनी महाराजांस पुष्कळ आग्रह केला पण ते येत नाहीत असे पाहून निराश होऊन टोळ आपल्या घरी गेले 


अर्थ -भावार्थ-मथितार्थ

वास्तविक चिंतोपंताचे प्रारब्ध संचित इतके मोठे होते की त्यास प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामी महाराजास सांगाती घेऊन जाण्याचे भाग्य लाभले होते पण सदसदविवेक बुद्धीने त्यांना कलेक्टर की श्री स्वामी समर्थ यांचा प्राधान्य क्रम ठरविता आला नाही निष्ठेची तेवढी परिपक्वता आणि आचर विचारातील खंबीरता त्यांच्यात आद्याप आली नव्हती यातून आपण काय बोध घ्यायचा हे आपल्या आकलनशक्तीवर अवलंबून आहे आता प्रत्यक्ष श्री स्वामी सदेह सगुण स्वरूपात आपणास भेटणार नाहीत हे खरे आहे पण प्रसंगानुसार निर्गुण निराकार स्वरूपात अथवा एखाद्या माध्यमातून अथवा अन्य स्वरूपात भेटू शकतात ती ओळखण्याची पात्रता साधनेतून मिळवता येईल हे लक्षात असू द्यावे यासाठी नोकरी प्रपंच उद्योग धंदा उदर्निर्वाहासाठी काही करुच नका देव देव करीतच राहा असा अर्थ नाही तटस्थ राहून अलिप्तपणे तो करावा त्यात गुरफटून जाऊ नये अडकू नये हे टोळास न जमल्यामुळे परब्रम्ह त्याच्या हातून निसटले प्रेमाने भावभक्तीने ओथंबलेले निष्ठेने ठासून भरलेल्या मुठीएवढ्या काळजाची अंतःकरणाची गरज भगवंतास असते त्यास दुसरे तिसरे काही नको असते टोळांजवळ ते नव्हते घरी चलावे अशी श्री स्वामींस वारंवार विनंती करुनही त्यांनी चिंतोपंतास स्पष्टच सांगितले आमचे घर निराळे आहे कारण टोळाच्या मुठीएवढ्या अंतःकरणात अजूनही त्याने श्री स्वामी समर्थ महाराजांची स्थापना केली नव्हती हेच खरे यावरून श्री स्वामींना कोणते घर अधिक भावते हेच येथे प्रबोधित होते 

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या