पुढे सुमारे एक महिन्याने श्री स्वामी समर्थ महाराज फिरत फिरत सेवेकर्यांसह हचनाळ गावी आले दोन दिवस त्या सर्वांचा श्री स्वामींसह मुक्काम पडला त्या गावात एकच विहीर होती त्याकरिता गोपाळबुवांनी रात्री असा विचार केला की आपल्याजवळ भांडे नाही आणि आपली येथे ओळखही नाही करिता कोणी उठण्याच्या आत रात्री उठावे असे त्यांना वाटले बुवास तंबाखू ओढण्याची सवय होती त्यांनी चिलमीत तंबाखू भरली आणि चिलमीच्या विस्तवासाठी ते फिरत फिरत श्री स्वामी समर्थांजवळ तेवत असलेल्या समई जवळ आले विस्तवासाठी सुंभाची गुंडी समईच्या ज्योतीवर धरली अर्धी गुंडी पेटल्यावर अचानक श्री स्वामी समर्थ उठून बसले बुवा घाबरले त्यांच्या अंगाला कापरे भरल्यामुळे हातातील समईस विस्तवासाठी धरलेली गुंडी खाली पडली तेव्हा श्री स्वामींनी बुवांवर एकसारखी दृष्टी लावली तेव्हा घाबरलेल्या बुवांनी त्यांच्या मनातील हेतूची (अनुग्रह मिळावा) अशी प्रार्थना केली त्यावेळी श्री स्वामी समर्थांनी गोपाळबुवांवर आपल्या कृपाबळाने अनुग्रह केला .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाभागात गोपाळबुवा सडेफटिंग त्यांच्या जवळ फक्त एक पंचा आणि धोतर होते पाणी पिण्यास भांडेही त्यांच्याजवळ नव्हते असे ते विरक्त होते अनुग्रह मिळवताना कमालीची विरक्ती तृप्ती आणि सेवेतील व्रतस्थता असावी लागते सध्याच्या २१ व्या शतकात तुम्हा आम्हाला हे अवघड आणि अशक्य वाटेल परंतु संसार प्रपंच व्यवहार व्यापार उदीम आदी यशस्वी करुनसुध्दा विरक्तपणे जगणारे आणि जीवन व्यवहार सांभाळणारे काही लोक असतात आहेत कदाचित ते मठ मंदिरात जात नसतील पारायणे अनुष्ठाने आदि करीत नसतील अंगास भस्म अथवा अन्य मुद्रा कपाळी गंध टिळे लावीत नसतीलही परंतु उपभोगशून्य वैराग्यवृत्तीने जगणारे काही लोक आहेत ते अनुग्रहास निश्चितच पात्र होतात.

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या