बिर्हाडी आलेल्या त्या बाईस रात्री दहा वाजण्याचे सुमारास निजतेवेळी तळ्याकाठी पुरुन ठेवलेल्या दोन खारकांची आठवण झाली पण रात्र काळोखी असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ती तळ्यावर गेली ज्या ठिकाणी खारका पुरुन ठेवल्या होत्या त्या ठिकाणी खारका ती उकरुन पाहते तो खारकांऐवजी तिला दोन अंडी दिसली ती अंडी कसली असावीत असा विचार करीत ती हातात घेऊन पाहते तोच ती अंडी हातातून निसटून खाली पडली आणि फुटली त्यातून दोन पक्षी बाहेर पडून उडून गेले हा चमत्कार पाहून ती चकित झाली हा सर्व वृत्तांत तिने तिच्या नवऱ्याजवळ व इतर मंडळींजवळ सांगितला ते सर्व तिचा धिःक्कार करुन म्हणाले तुला महाराजांनी सांगितले असून तू ऐकले नाहीस (तुझ्या प्रारब्धात नाही ) ती रडत रडत श्री स्वामींकडे आली घडलेला सर्व वृत्तांत तिने त्यांना सांगितला त्यावर ते रागाने तिला म्हणाले रंडी हमकू क्या पूछती है जाव निकल यहाँ से असे म्हणून तिला आणखी शिव्या दिल्या तथापि इतके होऊनही त्या बाईने त्यांची पाठ सोडली नाही आणखी सेवा ती करीतच राहिली पुढे श्री स्वामींनाच तिची दया येऊन तिला नारळाचा प्रसाद घेऊन जाण्याची आज्ञा दिली पुढे त्या बाईला थोड्याच दिवसांनी मुलगा झाला.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
या अगोदरच्या भागात त्या बाईच्या प्रारब्धाने तिचा पिच्छा सोडला नव्हता दुसऱ्या दिवशी ती खारका पुरलेल्या जागेवर तळ्याकाठी गेली तर तिला खारका ऐवजी दोन अंडी मिळाली ती अंडीही तिच्या हातातून निसटली ती जमिनीवर पडून फुटली त्यातून दोन पक्षी भुर्रकन उडून गेले दैव देते आणि कर्म नेते याचा प्रत्यय तिला आला श्री स्वामींनीसुद्धा तिला सांगितलेच होते अग तुझ्या प्रारब्धी नाही ते येथे खरे ठरल्याचे निदर्शनास येते इतके सर्व होऊनही तिने श्री स्वामींचा पिच्छा पुरवला रंडी हमकू क्या पूछती है जाव निकल जाव यहाँ से अशा शब्दात रागावून आणि शिव्या खाऊनही ती श्री स्वामींपासून हटेना परंतु स्वामी समर्थ हे दयेचे सागर आहेत अज्ञानी जीवांचे असंख्य अपराध पोटात घालणे हे तर त्यांच्या क्षमाशील वृत्तीला धरुनच होते या कथेतील त्या बाईला तिच्या प्रारब्धानुसार निपुत्रिकपणाचे दुःख भोगावे लागणारच होते ते भोगल्याशिवाय तिच्या प्रारब्धाचा निचरा होणार नव्हता पण तिच्या समाधानासाठी श्री स्वामींनी तिचे ते दुःख पुढील जन्मासाठी राखून ठेवले व पुढील जन्मातील पुत्रलाभाचा योग तिला या जन्मात दिला म्हणूनच त्या बाईला थोड्याच दिवसांनी यथावकाश मुलगा झाला आपल्या प्रारब्धात जे असेल ते श्री स्वामींची उपासना करीत करीत भोगणे इष्ट परंतु त्यासाठी श्री स्वामी समर्थांसारख्या दैवतांचा अकारण पिच्छा पुरवणे केव्हाही गैरच हा यातला अर्थबोध आहे.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या