यशवंत महादेव भोसेकर यांना स्वप्नात एका संन्याशाने पूजेस शालिग्राम देऊन सांगितले की तुला या शालिग्रामचे योगाने प्रपंच परमार्थ घडेल व जगात साधुपुरुष म्हणून तुझी कीर्ती गाजेल असा आशीर्वाद देऊन संन्याशी गुप्त झाले यशवंतराव जागे होताच त्यांना जवळच शालिग्राम दिसला ते नित्यनेमाने त्याचे पूजन करीत आलेल्या अतिथी अभ्यागतास भोजन घालीत पुढे त्यांना असा दृष्टान्त झाला की अक्कलकोटी जा आणि श्री स्वामी समर्थांचे दर्शन घे ते अक्कलकोटी आल्यावर त्यांनी श्री स्वामी समर्थांना पाहिल्यावर स्वप्नातील मूर्ती ती हीच अशी त्यांची खात्री झाली श्री स्वामींस नमस्कार करुन हात जोडून उभे राहताच श्री स्वामी महाराज म्हणाले शालिग्राम कोठे आहे हे ऐकताच यशवंतरावांनी शालिग्राम दाखविला श्री स्वामी समर्थांची स्तुती करीत ते म्हणाले महाराज आपण पूर्ण दत्तावतार आहात असे माझ्या पूर्ण अनुभवास आले श्री स्वामींची षोडशोपचारे पूजा करुन जाण्याची आज्ञा मागू लागले महाराज म्हणाले जा तुम्ही साधू म्हणून सर्व जगास मान्य व्हाल दुसरे दिवशी यशवंतराव अक्कलकोटाहून निघून आले


अर्थ / भावार्थ/ मथितार्थ

यशवंत महादेव भोसेकर हे साधू देवमामलेदार म्हणून प्रख्यात कीर्ती पावले त्यांचे स्वतंत्र चरित्रही श्री दीपक माळींनी लिहिले आहे श्री स्वामी समर्थ कृपेने त्यांचासाधुत्वाचा लौकिक दिवसेंदिवस वाढत गेला रोज शेकडो लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले सर्वांप्रती भगवदभाव पाहणेनिराभिमानस्थितीने वागणे हे त्यांचे मुख्य आचारविचार सूत्र हौ
होते सर्वसाक्षी असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या लोकोध्दाराच्या कार्याचा लक्षणीय विशेष असा की परमार्थात प्रगती केलेल्या करु पाहणाऱ्या आणि करु शकणाऱ्या योग्यांना यतींना साधू सत्पुरुषांना ते आपल्याकडे ओढून घेत किंवा गावी घरी भेट दर्शन घडवीत अथवा स्वप्नदृष्टान्त देऊन अक्कलकोटी ये अथवा अक्कलकोटी जा असे सूचित करीत त्यातील अनेक उदाहरणांपैकी यशवंतराव भोसेकर तथा साधूदेवमामलेदार हे एक ठळक उदाहरण आहे श्री स्वामी समर्थ सुमारे १२ वर्षे मंगळवेढ्यात असताना यशवंतराव भोसेकर त्यांच्या सहवासात होतेच त्यांना श्री स्वामींनी स्वप्नदृष्टांतात साधूरुपाने भेटून एक शालिग्राम दिला प्रपंच आणि परमार्थ उन्नतीकारक घडेल साधूत्वास पोहोचाल सर्वमान्य व्हाल असा आशीर्वादही दिला श्री भोसेकर यांना जागेपणी तो अंथरुणात मिळला व त्याचीच प्रचिती श्री स्वामींनी ती शिळा कोठे आहे रे असे विचारुन दिली वते साधू म्हणजे मीच ही खूण पटविली येथे श्री स्वामी समर्थ समाजासाठी कसे आणि कोणाव्दारे कार्य करीत या कल्पनेने थक्क व्हावयास होते यशवंतराव उर्फ साधू देवमामलेदार यांची मूळ प्ररणा श्री स्वामी समर्थ होते आपणही आपल्या परीने अद्यःस्थितीत आपल्याला झेपेल जमेल समजेल तेवढे सामाजिक काम करु शकणार नाही का 

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या