गणेश बल्लाळ मुळेकर हे गृहस्थ कोर्टात बेलीफ होते त्यांच्या बंधुच्या खटपटीमुळे ते कलेक्टर अॉफिसमध्ये नोकरीला लागले परंतु त्यांचे अक्षर वाईट असल्यामुळे ती जागा कलेक्टरने त्यांना दिली नाही इकडे बेलिफचीही जागा गेली त्यामुळे त्यांना घरीच बसावे लागले अशा स्थितीत त्यांनी अक्कलकोटी श्री स्वामी समर्थांकडे धाव घेतली श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेताच गणपतराव (गणेश) मुळेकरांना खूप आनंद वाटून त्यांना कमालीचे समाधान झाले नोकरी गेल्याबद्दल श्री स्वामी समर्थांना विचारावे म्हणून त्यांच्याजवळ मुळेकर चार चार घटका येऊन बसत परंतु श्री स्वामींचे ते तेज पाहून त्यांना काही विचारण्याचा धीर होईना रामनवमीच्या दिवशी एका सेवेकर्यांकरवी मुळेकरांनी फराळासाठी अर्धा मण दही देऊन श्री स्वामी समर्थास नोकरीबाबत विचारण्याची विनंती केली सेवेकर्यांने श्री स्वामींना विचारले महाराज त्यांची नोकरी गेली आहे ती केव्हा लागेल त्यावर महाराज उत्तरले नोकरी लागली आहे जा हे ऐकून मुळेकरांना समाधान वाटले पण किती रुपयाची अशी शंका मुळेकरांच्या मनात निर्माण झाली म्हणून त्यांनी सेवेकर्यांकरवी पुन्हा श्री स्वामींना विचारले महाराज नोकरी किती रुपयांची लागेल त्यावर श्री स्वामी महाराज म्हणाले लाख रुपयाची लागेल जा.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाभागात श्री गणेश बल्लाळ मुळेकर यांची बेलिफाची आणि कारकुनाची अशा दोन्हीही नोकऱ्या गेल्या अशा निराधार बेकार स्थितीत मुळेकरांनी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांकडे धाव घेतली श्री स्वामींच्या दर्शनाने त्यांच्या मनावर गारुड केले ते पूर्ण स्वामीमय झाले श्री स्वामींनीच लीला करुन मुळेकरांना निराधार केले व स्वतःकडे खेचून घेतले श्री स्वामी समर्थांची सेवा हेच मुळेकरांचे पुढे जीवित कार्य बनले पुढे दह्याचा नैवेद्य दाखवून सेवेकर्यांकरवी श्री स्वामींना मुळेकरांनी नोकरी बाबत विचारणा केल्यावर महाराज म्हणाले नोकरी लागली आहे जा किती रुपयाची या शंकेचेही निरसन श्री स्वामींनी लाख रुपयाची लागली जा असे सांगून केले या वया अगोदरच्या श्री स्वामी समर्थांच्या उदगारात अखेरीस जा हा निश्चयपूर्वक शब्द आलेला दिसतो याचा अर्थ भावार्थ आणि मथितार्थही काळजी का करतोस निश्चिंत राहा भिऊ नकोस मी पाठीशी आहे असा होतो निराधार बेकार असलेले हेच गणेश बल्लाळ मुळेकर केवळ आणि केवळ श्री स्वामी समर्थांच्याच कृपेमुळे त्यांनी सांगितलेल्या दिवशी सोलापूरला कचेरीत पंधरा रुपयाच्या जागेवर कारकून म्हणून त्यांची नेमणूक झाली थोड्या महिन्यांनी असिस्टंट कलेक्टरचे अॉफिसात वीस रुपयाची जागा त्यांना मिळाली व त्यांची नेमणूक अक्कलकोट पोलिटिकल एजंटसाहेब यांच्या कचेरीत झाली परिणामी गं.ब.मुळेकरांना श्री स्वामी महाराजांचे दर्शन सातत्याने घडू लागले पुढे पाच वर्षातच ते अव्वल कारकून होऊन त्याच साली मामलेदार झाले आणि पुढे फर्स्टक्लास मामलेदारही झाले नोकरी लागली आहे जा आणि लाख रुपयाची लागेल जा याचा प्रत्यय त्यांना आला या लीलाभागाचे चिंतन मनन आणि मंथन केल्यास त्यातूनच निश्चितच आपल्या प्रत्येकास बोधामृतांचे नवनीत मिळेल.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या