बुवांची आई आणि पत्नी या दोघांनी रडून रडून आकांत मांडला होता केविलवाणी विनवणी ऐकून तेथे जमलेल्यांना गहिवर आला होता परंतु श्री स्वामी समर्थ महाराज पोट धरधरुन हसत होते श्री स्वामींचे पाय घट्ट धरुन म्हातारी म्हणाली मला काय ते सांगितल्याशिवाय हे पाय सोडणार नाही हे ऐकून श्री स्वामींनी त्यांच्याजवळच असलेल्या मोत्या कुत्र्याला सांगितले अरे जाव उसकू लेकर आव श्री स्वामींचे शब्द कानी पडताच मोत्या कुत्रा पुराणिकबुवा जेथे बसले होते तेथे आला मोत्या कुत्र्याला पाहताच बुवांची खात्री पटली की श्री स्वामी महाराजांनी बोलावले आहे बुवा मोत्या कुत्र्याच्या मागून श्री स्वामींच्या दर्शनास आले बुवा जवळ येताच निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचि फळ असे श्री स्वामी समर्थांचे पाय घट्ट धरले बैस बैस असे ते बुवास म्हणाले आता बुवांनी पुराणास आरंभ केल्यावर श्री स्वामींनी ते प्रेमाने ऐकले पुढे बुवास स्वप्न दृष्टांत झाला की बुवा पूर्वजन्मी कसाई असल्यामुळे त्यांचे हातून पुष्कळ प्राणी हत्येबरोबरच गोहत्याही घडल्या पण एकदम ते स्नानास घाटावर गेले असताना थंडीने कुडकुडत असलेल्या ब्राम्हणास त्यांनी एक धोतर आणि एक घोंगडी दिली या पुण्याईमुळे त्यास ब्राम्हण म्हणून जन्म मिळाला परंतु त्यांचे पातक फार असल्यामुळे ते दुःख आणि दारिद्रयाने पिडलेले असत ते जागे झाले हा काय स्वप्न दृष्टांत स्नान करुन श्री स्वामींच्या दर्शनास गेले हात जोडून त्यांच्या समोर उभे राहताच ते म्हणाले आपले पाप काय आहे त्याचा विचार न करता दुसऱ्यावर दोषारोप करणे मादरचोदा या ज्ञानास काय म्हणावे किती प्राणी मारलेस याचे स्मरण आहे तुला .
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
या घटनेने सर्वांनाच गहिवर आला पण श्री स्वामी समर्थ मात्र पोट धरधरुन हसत होते का बरे खोलवर विचार केला तर बुवांची म्हातारी आई पत्नी आणि ते स्वतः सर्वसामान्य जीव भूत वर्तमान आणि भविष्याचे आकलन ते त्यांना किती असणार कोणत्याही परिस्थितीत अगतिक होणारे आपणासारखेच ते तिघे म्हणून सर्वच दुःखी झाले होते गहिवरले होते आपल्या सर्वांच्याच मर्यादा येथे स्पष्ट होतात परंतु श्री स्वामी महाराज आपल्या सर्वांची ही अशी अवस्था पाहून हसणारच तेही पोट धरधरुन कारण ते त्रिकालज्ञानी आणि सर्वसाक्षी भूत वर्तमान आणि भविष्याचा वेध घेणारे देव त्यांना सर्वांचेच प्रारब्ध ज्ञात होते बुवा विद्वान होते शास्त्र जाणत होते इतरांना पुराण सांगण्या इतपत सक्षम ज्ञानी होते परंतु वाट्यास आलेल्या दुःखाने आणि दारिद्रयाने उद्विग्न झाले होते त्यांच्या पूर्व जीवनाचा संपूर्ण वृत्तांतच श्री स्वामींना ज्ञात होता त्याची जाणीव बुवास करुन देऊन त्यांनी त्यास सांगितले दुसऱ्यावर दोषारोप करणाऱ्या तुझ्या या ज्ञानास काय म्हणावे चारही लीला भागाचा मुख्य मुद्दा आहे प्रारब्ध ते टाळता येत नाही बदलता येत नाही भोगूनच संपवावे लागते गुरुबळामुळे अथवा गुरुकृपेने फार तर त्याची तीव्रता कमी होऊ शकते ते सहन करण्याचे बळ मिळते म्हणून प्रारब्ध संचित याचा विचार करण्यात अथवा त्यास दोष देण्यात शक्ती श्रम व वेळ खर्च करु नये जे असेल ते श्री स्वामी समर्थ उपासना करीत प्रपंचात राहून विनातक्रार भोगत राहावे बावडेकर पुराणिक बुवांच्या या सर्व स्थित्यंतरास सहा महिने लागले आपणास किती लागतील निश्चित सांगता येणार नाही पण प्रत्येकाचा प्रारब्धाचा कालावधी कमी अधिक असू शकतो उपासना करीत तो सहन करणे एवढेच आपल्या हातात आहे हा इथला अर्थबोध आहे.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या