मुंबईचे द्वारकानाथ वकील कुटुंबासह श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास अक्कलकोटला आले त्यांनी श्री स्वामी समर्थांपुढे कापराच्या वड्याच्या वड्या लावल्या पलंगावर निजलेले श्री स्वामी महाराज उठून रागाने वकीलास म्हणाले बेटा मांगनेकु आया है हमारे हनुमान अंधेरे में बैठे है उनके तरफ देखता नही वकीलास श्री स्वामींच्या या बोलण्याचा अर्थ न कळल्यामुळे ते श्री स्वामींच्या मुखाकडे पाहतच राहिले तेव्हा श्री स्वामी पुन्हा म्हणाले मुरलीधरके देवल में हमारा हनुमान अंधेरे में है भुजंग शिपायाने मुरलीधराच्या देवळात जाऊन स्वामीसुत अंधारात बसले असल्याचे पाहून परत येऊन वकीलास सांगितले तुम्ही मुरलीधराचे देवळात स्वामीसुतापुढे दिवे लावा म्हणजे तुमच्यावर महाराज कृपा करतील त्याप्रमाणे वकीलांनी मुरलीधराच्या देवळात दिवे लावून मोठी आरास केली आणि ते श्री स्वामी समर्थांकडे आले त्यांनी वकीलास चणे आणण्यास सांगितले श्री स्वामी महाराजांनी ते चणे एक तासभर हातात खेळवून (घोळवून) त्यास प्रसाद म्हणून दिले नंतर थोड्याच दिवसांत मुंबईच्या द्वारकानाथ वकीलास मुलगा झाला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलेतील मुंबईच्या द्वारकानाथ वकीलास पुत्र संतान व्हावे या हेतूने तो कुटुंबासह अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आला कापराच्या वड्या श्री स्वामी महाराजांपुढे लावल्यावर श्री स्वामी उठून त्याच्या मनातील हेतू ओळखून म्हणाले बेटा मांगनेकु आया है यावरुन वकीलास ततक्षणी श्री स्वामींच्या अंतःसाक्षित्वाची प्रचिती आली श्री स्वामींच्या सुचनेनुसार द्वारकानाथ वकीलाने मुरलीधराच्या देवळात येऊन अंधारात बसलेल्या स्वामीसुतापुढे दिवे लावून मोठी आरास केली या कथेत श्री स्वामी महाराजांनी स्वामीसुतास हमारे हनुमान म्हणून संबोधले आहे हरिभाऊ तावडे हे स्वामीसुत म्हणून श्री स्वामी चरित्रात प्रसिद्ध आहेत हनुमान पवनपुत्र आहे (आत्मा ) रामाचा (प्राणवायू) सखा हा पवनपुत्र हनुमान आहे अंधेरे में बैठे है हेही श्री स्वामींनी जाणले होते श्री स्वामी सुतांच्या दृष्टीने पित्यासम असलेल्या सदगुरु श्री स्वामी समर्थांचे किती चौफेर लक्ष आणि निस्सीम भक्ताची किती काळजीही होती याची कल्पना येते द्वारकानाथ वकीलानेही श्री स्वामींचा आदेश प्रमाण मानून मुरलीधर मंदिरात आरास लावण्याची कृती केल्यावर श्री स्वामी हस्तस्पर्शाच्या चण्यांचा प्रसाद त्यास मिळाला पुढे त्यास पुत्रही झाला या लीलाकथेतून श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व भक्ताबद्दलची सदैव वत्सलता निष्ठावंतांची इच्छापूर्ती करण्याची वृत्ती निश्चितच आपणा सर्वांस बोधित करते.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या