अक्कलकोटात एके दिवशी एक बाई दुसऱ्या बाईस म्हणते अगं काशी विश्वेश्वराला येतेस का तेव्हा त्या दुसऱ्या बाईने उत्तर दिले काशीस कशास येऊ श्री स्वामी महाराज हे काशी विश्वेश्वरच येथे अक्कलकोटात आहेत बरे हा त्या दोघींचा संवाद ऐकून श्री स्वामी समर्थ खदा खदा हसू  लागले आणि दुसऱ्या बाईस म्हणाले तुला इतके ज्ञान असते तर भाकर्या का बडविल्या असत्यास.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

वरील लीलाकथा भागातील संवाद दोन साध्या भोळ्या स्त्रिंयामधला आहे पण दोघींच्याही दृष्टिकोन भक्ती श्रद्धा यात फरक आहे म्हणून त्यातील एक दुसरीस विश्वेश्वराच्या दर्शनास काशीला येतेस का म्हणून विचारते म्हणजे प्रत्यक्ष श्री स्वामींचे सदेह दर्शन सहवास अक्कलकोटात होत असूनही तिच्या बुद्धीला मनाला देवत्व जाणवत नाही पण दुसऱ्या स्त्रिला मात्र अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हेच चालते बोलते काशी विश्वेश्वर येथे अक्कलकोटातच आहेत तर काशीला जाण्याची गरजच नाही दुसरीच्या या उदगारावर श्री स्वामी खदखदा हसून एक प्रकारे स्वतः काशी विश्वेश्वर असल्याची संमतीच देत आहेत असे हे श्री स्वामी समर्थ सगुण स्वरुपात अक्कलकोटात वावरत होते ३० एप्रिल १८७८ ला त्यांनी समाधी घेतली अवतार संपवण्याचा त्यांचा हा एक चमत्कारच होता पण सद्यःस्थितीतही त्यांच्या कृपेची मदतीची अनेकांना अनुभुती येते त्यांचा वावर आणि अस्तित्व आजही निर्गुण निराकार स्वरुपात आहे याबद्दल अनेक ज्ञात अज्ञातांनी विद्वान पंडीत चिकित्सकांनी प्रचितीच्या बोलामध्ये अनुभव सांगितले आहेत ज्ञात अज्ञातांनी श्री स्वामी समर्थांचे त्यांच्या समाधी नंतरचे आलेले अनुभव लिहिलेले आहेत त्यातून त्यांचे निर्गुण स्वरुपातील दैवी स्वरुप प्रत्यक्षात येते तुला इतके ज्ञान असते तर भाकर्या का बडविल्या असत्यास श्री स्वामींच्या या उदगारात खूप गहणता व अनेक विचारांचे पदर आहेत पण त्याचा सारांश इतकाच की प्रत्येक साधक उपासक भक्त सेवेकर्याने देव देवत्व (दया क्षमा शांती करुणा आणि सत्यम शिवम सुंदरम कोठे कोणात कसे आहेत हे ओळखण्यास व तसाच आचार विचार आणि व्यवहार करण्याचा प्रयत्न करावयास शिकले पाहिजे असे जर केले तर असल्या ठायीच देव असल्या ठायीच काशी पंढरपूर या संत उक्तीचा प्रचिती येईल संसार उद्योग नोकरी व्यवसाय करता करता देव दैवी तत्त्वाशी अनुसंधान ठेवत जीवन जगता येते हेच श्री स्वामींना येथे सूचित करावयाचे आहे हाच इथला अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या