तीन चार दिवसांपासून उपाशी असलेल्या श्री स्वामीस (अवलिया)कोणा एखाद्या ब्राम्हणाकडे नेऊन भोजन घालावे असे रिसालदार अहमदशहाच्या मनात आले चोळाप्पाचे घर जवळच होते त्यास सर्व हकीकत सांगून श्री स्वामी समर्थास जेवू घालण्यास सांगितले चोळाप्पाच्या घरी स्वयंपाक सिध्द झाल्यावर रिसालदार अहमदशहा श्री स्वामी समर्थास भोजनासाठी घेऊन आला चोळाप्पाने ताट वाढून श्री स्वामी समर्थांपुढे ठेवले पण ते जेवेनात रिसालदार अहमदशहास त्यांच्यापुढे वाढलेल्या ताटास हात लाव म्हणून ते सांगू लागले ब्राम्हणाच्या भोजनाच्या ताटास हात कसा लावावा म्हणून तो शंकित झाला हात लावेना डरो मत हाथ में पकडो अशी श्री स्वामींनी त्यास पुन्हा आज्ञा केली त्यानंतर त्याने निरुपाय होऊन ताटास हात लावल्यावरच श्री स्वामी समर्थ मोठ्या प्रेमाने जेवले


अर्थ -भावार्थ-मथितार्थ

रिसालदार अहमदशहास श्री स्वामी समर्थ हे अवलिया आहेत याची प्रचिती आली होती त्यांच्यातले देवत्व त्यास जाणवले होते त्यांच्याबद्दल अपार भक्तिभाव आता त्याच्या मनात निर्माण झाला होता यातूनच अहमदशहास जाणवले की हा अवलिया (श्री स्वामी )तीन चार दिवसांपासून निराहार आहे त्यांना जेवू घालणे क्रमप्राप्त आहे नव्हे आपले कर्तव्यच आहे अहमदशहात झालेला हा बद्दल आपण सर्वांनीच नोंद घेण्यासारखा आहे त्याच्या जाणिवा आता संवेदनशील झाल्या होत्या श्री स्वामींना जेवू घालण्यास तो उतावीळ झाला होता हे असे बदल घडवून आणण्यासाठी देवदिकास रिकाम्या चिलमीतून धूर ज्वाला काढण्याचे चमत्कार लीला कराव्या लागतात कारण तुमच्या माझ्यासारखी निबर मनाची माणसे चमत्काराशिवाय नमस्कार घालीत नाहीत देवदिकांना चमत्काराचा व आपल्याला कुणी नमस्कार घालावा याचा सोस नसतो पण त्यांना आपल्यासारख्या निद्रिस्तांना सजग जागे करावयाचे असते जवळच चोळाप्पाच्या घरी श्री स्वामींच्या भोजनाची व्यवस्था अहमदशहाने केली तत्पूर्वी श्री स्वामींचे अवलियापण त्याने मोठ्या भक्तिभावाने चोळाप्पास सांगितले चोळप्पाने श्री स्वामी समर्थांच्या भोजनाची सर्व सिध्दता करुन त्यांच्यापुढे भोजनाचे ताट मांडले पण श्री स्वामी महाराज जेवेनात ताटास हात लाव म्हणून अहमदशहास श्री स्वामी समर्थ सांगत होते ब्राम्हणाचे भोजनाच्या ताटास हात कसा लावावा म्हणून तो शंकित झाला होता तो ताटास हात लावेना आपल्यासारख्या मुस्लिमाने ताटास हात लावल्यास विटाळ होईल श्री स्वामींचे भोजन बाटेल या विचाराने तो त्या भोजनाच्या ताटास हात लावण्यास बिचकू लागला तेव्हा श्री स्वामी त्यास निर्धाराने म्हणाले हाथ में पकडो डरो मत त्याने सर्वांसमक्ष त्या ताटास स्पर्श केल्यानंतरच श्री स्वामी समर्थ समाधानाने स्वहस्ते जेवले पुढे श्री स्वामी स्वतःच्या हाताने जेवल्याचे सहसा आढळत नाही त्यांना बहुतेक वेळा लहान मुलासारखे भरवावे लागे हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे म्हणून आपण सर्वांनी श्री स्वामी महाराजांसमोर नैवेद्य नुसता ठेवू नये तर त्यातील घास प्रेमाने भक्तीभावाने त्यांच्या मुखास लावून भरवावेत लहान बालकास ज्या प्रेमाने आपण भरवतो तसे श्री स्वामींस भरवावे त्याने ते तृप्त होतात जेवून समाधानी पावतात या लीलेतून खूप मोठा अर्थबोध मिळतो तो सध्याच्या २१ व्या शतकाशी सुसंगत आहे तो अर्थबोध प्रगत आणि कालबाह्य रुढी परंपरास छेद देणारा आहे तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या उध्दारासाठी मी आलो आहे सोवळ्या ओवळ्याचे जाती पातीचे धर्म भेदाचे कर्मकांडाचे अवडंबर मिटविण्यासाठी मी आलो आहे त्याचा विधिनिषेध माझ्याजवळ चालणार नाही हेच त्यांना या लीलाप्रसंगाच्या निमित्ताने सांगावयाचे आहे आता या सर्वाचा मथितार्थ समजून घेऊन प्रत्यक्ष आचरणात आणावयाचा ते आपल्या सर्वांवर अवलंबून आहे 

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या