खेडगावचे नारायण भट शके १७९२ (इ.स.१८७०) च्या अश्विन शु.३ रोजी गिरीच्या व्यंकोबास गेले असता श्री स्वामी समर्थांनी त्यास पर्वतावर दर्शन दिले पुढे चार महिन्यांनी नारायण भट अक्कलकोटास आले तेव्हा त्यांनी श्री स्वामी समर्थांना विचारले महाराज मला चार महिन्यांपूर्वी व्यंकोबाच्या गिरीवर भेटला होतात तेथे आपण केव्हा गेला होतात त्यावर श्री स्वामी म्हणाले ते पुण्यक्षेत्र आहे लक्ष्मीचा उत्सव होता म्हणून मी गेलो होतो हे ऐकून अक्कलकोट्वासीयांना मोठे आश्चर्य वाटले कारण अक्कलकोट सोडून श्री स्वामी महाराज इतक्या लांब कधीच गेले नाहीत .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थ महाराज अनेकदा त्यांच्या सूक्ष्म लिंगदेहाने विविध ठिकाणी फेरफटका मारुन येत असत असे त्यांच्या चरित्राच्या सूक्ष्म अभ्यासावरुन दिसून येते आपल्या पदस्पर्शाने विविध तीर्थक्षेत्रात मठ मंदिरात पावित्र्य आणि नवचैतन्य आणणे हा त्यांचा उद्देश दिसतो ते अक्कलकोटात वास्तव्यास राहूनही त्याच वेळी ते नारायण भटास व्यंकोबाच्या गिरीवर भेटले ही श्री स्वामी समर्थांची एक अगाध लीलाच म्हणावी लागेल नारायण भटाने जेव्हा श्री स्वामींस गिरीच्या व्यंकोबास (व्यंकटेश्वरास) कसे काय व कधी गेलात असे विचारल्यावर श्री स्वामी महाराजांनी व्यंकोबाचे गिरीस्थान हे तीर्थक्षेत्र असल्याचे आणि तेथे लक्ष्मीचा उत्सव असल्याचे सांगितले श्री स्वामींना मायामुक्त अवधूत स्वरुपाचा कधीही विसर पडलेला नव्हता की त्यांना विद्यमान मायायुक्त स्वरुपातही तिटकारा वाटत नव्हता या त्यांच्या अशा स्वरुपामुळेच ते गिरनार अबू हिमालय पर्वतावर श्रीशैल्य गिरी आदि ठिकाणीही जात जगन्नाथपुरी व्दारका रामेश्वर काशी ही तर त्यांचीच ठिकाणे होती माहूर कोल्हापूर तुळजापूर सप्तशृंगी ही तर त्यांची शक्तिपीठे होती या स्थानांशी निगडित अनेक लीला त्यांच्या अवतारचरित्रात आढळतात या लीलेतून त्यांच्या अगाध सामर्थ्याचा बोध होऊन त्यांच्या पायाशी लीन दीन होऊन त्यांचे कृपाछत्र मागण्यास आपण उद्युक्त होतो श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात अश्विन शु.५ शके १७७९ म्हणजे दि.२३.९.१८५७ आल्यानंतर देहरुपाने कुठे गेल्याचे कोणास कधी दिसत नसले तरी ते मायामुक्त अवधूत म्हणजे सूक्ष्म स्वरुपाने सर्वत्र वावरत व त्या त्या स्थानी आपली स्वरुपे दाखवीत म्हणूनच श्री स्वामी समर्थ हे दूर आहेत तसे जवळही आहेत म्हणूनच ते अक्कलकोटात वास्तव्यास राहूनही (मायायुक्त स्वरुप) नारायण भटास व्यंकोबाच्या गिरीवर (मायामुक्त अवधूत स्वरुप ) भेटले यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही ही तर श्री स्वामींच्या सामर्थ्याची व अदभुत शक्तीची किमया आहे व्यक्त अव्यक्त स्वरुपात ते तेव्हाही आणि आताही आहेत .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या