पांडुरंग केशव पटवर्धन नावाच्या मनुष्यास श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचे वेड लागले होते तो अधून मधून अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ दर्शनास येत असे असाच तो दर्शनास आला असता श्री स्वामी त्यास म्हणाले तुमचे तोंडात दात आहेत तितके वर्षे तुम्ही राहल असे म्हणून पांडोबास प्रसाद दिला व परत घेतला पुढे पांडोबाची प्रकृती बिघडून ते त्याच्या बत्तिसाव्या वर्षी ठमोई गावी वारले मरणापूर्वी दोन दिवस महाराजांनी पांडोबास प्रत्यक्ष दर्शन दिले होते.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलेत श्री स्वामी समर्थांनी पांडोबास त्याची आयुर्मयादा सांगितली आहे इतक्या उघडपणे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सूचित करण्याच्या लीला श्री स्वामींनी फार थोड्या वेळा केलेल्या आहेत उदा.बाबासाहेब जाधव चोळाप्पाची मुलगी राजूबाई दिनकरराव शेणवी आणि स्वामीसूत यांच्याच बाबतीत श्री स्वामींनी त्यांचे मृत्यू सूचित केले होते या ग्रंथात इतरत्र त्या संबंधीचे विवेचन आले आहे या लीलेत पांडोबाचा मृत्यू इतक्या उघडपणे सूचित करण्याचे कारण बहुधा पांडोबाचे जे काही आयुष्य उरलेले असेल त्या आयुष्यात त्याने अधिकाधिक भक्तिमार्गाकडे उपासनेकडे वळावे हेच असावे कारण पांडोबा श्री स्वामींच्या फक्त दर्शनाकरिता ते ही अधून मधून येत असल्याचा उल्लेख वरील लीलेत आहे कायम स्वरुपाचे श्री स्वामींशी उपासनेचे अनुसंधान जोडले गेल्याचा येथे उल्लेख दिसत नाही उपासनेत सातत्य जागृतता सावधानता एकाग्रता आणि सदैव अनुसंधान असावे लागते तसे पांडोबाचे येथे दिसत नाही पांडोबाच्या उदाहरणावरून आपण योग्य तो बोध घ्यावा आणि उर्वरित आयुष्यात श्री स्वामी समर्थांच्या उपासनेशी सततचे अनुसंधान ठेवावे हा ठळक बोध या लीलेतून मिळतो कै.ना.ह.भागवत या श्री स्वामी समर्थांच्या आद्य चरित्रकाराने केलेला उल्लेख रा.रा.गोविंद विष्णू भिडे मुंबईहून अक्कलकोटास श्री स्वामींना भक्ती मार्गाविषयी विचारण्याचा हेतू मनात ठेवून आले असता भिड्यांनी काही विचारण्याच्या आतच श्री स्वामी भिड्यास म्हणाले उपासनेला दृढ चालावे!सत्कर्म योगे वय घालवावे!!भूदेव संतासि सदा लवावे!सर्वामुखी मंगळ बोलावे!!हा श्लोक ऐकताच भिडेंना श्री स्वामींच्या अंतर स्थिती ज्ञातेबद्दलची खात्री झाली त्यांचा उपासने बाबतचा दृष्टिकोनही कळला तसा तो आपल्या सर्वांसाठीही आहे तो आपणा सर्वास कळावा ही अपेक्षा.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या