श्री स्वामी भक्तीत बाळाप्पा सर्वस्व घर दार बायको मुले समृद्धी आदि सारे काही विसरला होता अशा या बाळाप्पास श्री स्वामी समर्थ कधीही प्रसाद देत नसत (या अगोदर शेषाचार्य आग्निहोत्री बुवासही श्री स्वामी समर्थ प्रसाद देत नसल्याचा उल्लेख आहे) ( बखर१२४ अ ब क) त्यामुळे बाळाप्पा हरमुसला होई त्यास नेहमी वाटत असे की समर्थ मला प्रसाद का देत नाहीत एकदा त्याने श्री स्वामी समर्थांपुढे खारका आणून ठेवल्या व एक खारीक आपणास मिळावी अशी प्रार्थना केली परंतु ती मिळाली नाही चोळाप्पाने खारका उचलून त्यातील दोन खारका बाळाप्पास दिल्या बाळाप्पाला तोच आनंद वाटला आणि तो जाऊ लागला ते पाहून श्री स्वामी समर्थ चोळाप्पास म्हणाले अरे चोळ्या त्याला (बाळाप्पास) काही द्यायचे नाही जा त्याला दिलेल्या खारका परत घेऊन ये चोळाप्पाने धावत जाऊन बाळाप्पाजवळून खारका मागून आणल्या बाळाप्पाला फार वाईट वाटले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

सदगुरु श्री स्वामी समर्थांच्या नित्य सहवास व सेवेसाठी बाळाप्पाने सुख समृध्दीने भरलेला संसार सोडला कडकडीत वैराग्य धारण केले यात त्याचा कसलाही स्वार्थ नव्हता की ते त्याचे स्मशान वैराग्यही नव्हते ते मनापासूनचे निष्काम वैराग्य होते प्रखर गुरुभक्ती होती ज्याला वाटेला लावायचे असे त्यास श्री स्वामी प्रसाद देऊन वाटेला लावीत पण ज्याला काहीतरी आगळे वेगळे घडवायचे आहे असे त्यांना वाटे तेव्हा ते त्यास प्रसाद देत नसत श्री स्वामी समर्थांसारख्या अवतारी भगवंतास बाळाप्पाकडून पुढे मोठे कार्य करुन घ्यायचे होते त्यांनी त्याच्यातील प्रखर निष्ठा कठोर मनोविग्रह आणि कडकडीत वैराग्य हेरले होते त्यालाही श्री स्वामी समर्थांपुढे सारे काही तृणवत वाटत होते बाळाप्पास खारकासारख्या मामुली वस्तू द्यावयाच्या नव्हत्या त्यांना बाळाप्पास घडवावयाचे होते त्यास खारका न देण्यातून त्यांना असेच सुचवावयाचे होते की अरे बाळाप्पा तुझ्या भाग्यात परमात्मा स्वरुपाचे पंचपक्वान्न असताना तू खारका रुपी प्रपंचाच्या कण्या खात बसण्यात कोणते हाशील आहे हे पंचपक्वान्नाचे ताट फक्त सदगुरु श्री स्वामी समर्थच देणार हे त्यास आता पुरते उमगले होते पुढे त्यांची कृतिशील पावले त्या दिशेनेच पडली आजही बाळाप्पा महाराजांचे चरित्र आणि अक्कलकोटातील गुरु मंदिर मठ त्याची साक्ष आहे म्हणूनच श्री स्वामी समर्थ संप्रदायात म्हटले आहे की बाळाप्पा सारखा शिष्य होणे नाही क्षुल्लक गोष्टींची वस्तूंची अभिलाषा न बाळगता काही तरी आगळे वेगळे गुरू चरणांची व परमेश्वराची सदैव सेवा मागणे हेच अंतिम ध्येय असावे हा इथला अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या