दिनकरराव आनंद शेणवी हे अक्कलकोट संस्थानाचे कारभारी होते त्यांना डोळ्यांचा विकार होऊन रात्रंदिवस त्यांच्या डोळ्यांची आग आग होत होती त्यामुळे ते त्रासून गेले होते वैद्य डॉक्टरांचे उपाय करुन झाले पण गुण काही येईना एके दिवशी त्यांनी श्रीपाद भटजीस श्री स्वामींना प्रार्थना करुन डोळ्यास औषध विचारावयास सांगितले श्रीपाद भटजींनी श्री स्वामींस औषध विचारले असता महाराज म्हणाले तीन दिवस हत्तीचे मूत घाल म्हणजे डोळे बरे होतील श्री स्वामींनी सांगितले हे औषध श्रीपाद भटजीने कारभार्यास कळविले कारभार्याने त्याप्रमाणे तीन दिवस हत्तीचे मूत घालताच डोळे साफ बरे झाले त्यांना स्वच्छ दिसू लागले डोळ्यांनी आग आग होणे पूर्णत थांबले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीला कथेतील अक्कलकोटचे कारभारी दिनकरराव शेणवी संस्थानाच्या कारभारी पदामुळे उन्मत्त आणि भोगवादी नास्तिक झाला होता डोळे बरे होण्यासाठी त्याने डॉक्टर वैद्य इ.चे उपचार केले पण गुण नाही प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात सदेह स्वरुपात वावरत असताना त्यावेळी शेकड्याने लोक त्यांच्याकडे औषधोपचार व्याधी पीडा यावर उपाय विचारण्यास येत हा कारभारी मात्र श्री स्वामींच्या दर्शनास गेल्याचा उल्लेख या लीलेत नाही यावरुन त्यांचा नास्तिकपणा आणि उन्मत्तपणाच दिसतो त्यांनी श्री स्वामीस शरण जाऊन त्यांचे दर्शन घेऊन डोळ्यांसाठी औषध स्वतः विचारण्या ऐवजी श्रीपाद भटजींद्वारे श्री स्वामींना विचारले काय म्हणावे कारभार्याच्या या बुद्धीला आणि वृत्तीला अशी वृत्ती केव्हाही घातकच असते हा बोधही तुम्हा आम्हाला घेण्यासारखा आहे कारभार्याच्या या वृत्तीकडे दुर्लक्ष करुन दयाघन श्री स्वामींनी तीन दिवस हत्तीचे मूत डोळ्यात घालावयास सांगितले डॉक्टर वैद्य यांच्याकडे जाऊन थकलेल्या कारभार्यास हा उपाय विचित्रच वाटला तरीही नाइलाज म्हणून त्याने हा उपाय केला त्याचाच गुण येऊन त्यास लख्ख दिसू लागले डोळ्यांची आग ही थांबली डोळे पूर्ण बरे झाले या कथेचा खोलवर मथितार्थ शोधण्याचा प्रयत्न केल्यास श्री स्वामींनी सांगितलेल्या उपायात मोठा अर्थपूर्ण संकेत दडला आहे हत्ती हे बुद्धीचे प्रतीक आहे पण ही बुद्धी म्हणजे सारासार विवेकबुद्धी हत्तीचे मूत्र याच अर्थ येथे भोगवासना घेणेच उचित आहे दिनकरराव अक्कलकोटात राहून संस्थानचे कारभारी म्हणून काम पाहत होते पण त्यांच्या डोळ्यावर उन्मत्तपणाचा अधिकाराचा अहंकाराचा आणि नास्तिकतेचा पडदा आला होता म्हणून त्यास सुरुवातीस श्री स्वामी त्याज्य आणि उपेक्षणीय वाटत होते अखेरीस उपाय थकल्यावर त्याने श्रीपाद करवी श्री स्वामींकडून उपाय मिळवला श्री स्वामींस कारभार्याच्या वृत्ती घालवायच्या होत्या म्हणून हत्तीचे मूत्र तीन दिवस डोळ्यात घालावयास सांगितले उपायाचे तीन दिवस म्हणजे तीन टप्प्यांचा उल्लेख या अगोदरच्या विवरणात आला आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या