गोपाळ रामचंद्र केळकर हे रेल्वेत नोकरीस होते त्यांना एकदा ताप येऊन त्यांच्या पोटात रोग झाला सुमारे सहा महिने वैद्य वगैरे पुष्कळ उपाय केले पैसही बरेच खर्च झाले पण गुण काही येईना वेदना इतक्या होत होत्या की मरण येईल तर बरे असे गोपाळबुवांस वाटे ते नास्तिक होते परंतु त्याही स्थितीत त्यांनी नवस केला की जो कोणी या जगताचा ईश्वर असेल त्याने आठ दिवसांत माझी पोटदुखीची व्याधी दूर केली तर त्या एका भगवंताशिवाय अन्य कुणाचीही मी चाकरी करणार नाही चमत्कार असा झाला की गोपाळबुवांची व्याधी श्री स्वामी समर्थ कृपेने खरोखर आठ दिवसांत बरी झाली केलेल्या नवसाप्रमाणे गोपाळबुवा अक्कलकोटला आले त्यांनी श्री स्वामी समर्थांची सेवा सुरू केली पण श्री स्वामी महाराज प्रसन्न होईनात चार महिन्यांनी रात्री गोपाळबुवांच्या स्वप्नात येऊन श्री स्वामी म्हणाले तुझा रोग आम्ही नाहीसा करतो असे म्हणून गोपाळबुवांच्या पोटावरुन हात फिरवला आणि ते निघून गेले गोपाळबुवा जागे झाले त्यांना भरपूर लघवी होऊन त्यांचे पोट हलके झाले दुसऱ्या दिवशी गोपाळबुवा श्री स्वामींच्या दर्शनास गेले असता त्यांना पाहून भटाचे आता पोट पहा असे श्री स्वामी म्हणाले .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

गोपाळबुवा केळकर हे त्यावेळची इंग्रजी तिसरी शिकलेले होते ते सुरुवातीस नास्तिक होते परंतु त्यांना आस्तिक बनविण्यासाठी श्री स्वामींना वरील लीला करावी लागली नरदेही नरसिंह प्रगटला तरु पोटी नास्तिकाच्या कश्यपूला आस्तिकाची देण्या गती हाच तर श्री स्वामी समर्थांच्या अवतार कार्याचा गाभा आणि हेतू आहे गोपाळबुवांसारख्या सुशिक्षित नास्तिकाला गती देण्यासाठी आणि त्यांच्याकडून बखरीचे लिखाण करुन घेण्यासाठीच श्री स्वामींना ही लीला करावी लागली जीवघेण्या दुखण्याला कंटाळून बुवा निर्वाणीचे बोलले जो कोणी या जगताचा ईश्वर असेल त्याने आठ दिवसांत माझी पोटदुखीची व्याधी दूर केली तर उरलेल्या माझ्या आयुष्यात त्या एका भगवंताशिवाय अन्य कुणाचीही मी चाकरी करणार नाही बुवांच्या या घोर प्रतिज्ञेने त्यांच्या जीवनाचा कायापालट झाला श्री स्वामींनी बुवांची व्याधी दूर केली आता प्रतिज्ञा पूर्ण करण्याची जबाबदारी गोपाळबुवा केळकरांची होती ती त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या प्रत्यक्ष पाहिलेल्या अनुभवलेल्या ऐकून खात्री करुन घेतलेल्या लीलांची मोडी भाषेत बखर लिहून पार पाडली तिचेच डॉ.रा.चिं.ढेरेंनी मराठी संपादन करुन सर्वांस उपलब्ध करुन दिली तीच श्री स्वामी समर्थ बखर मूळ मोडी बखर चिपळूणच्या मठात जतन करुन ठेवली आहे आपल्यावर बुवांसारखी श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सद्यःस्थितीतही कृपा करीत असतात पण आपण केलेल्या प्रतिज्ञा दिलेला शब्द पाळतो का अनेकदा नाही .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या