श्री स्वामी समर्थांकडून नोकरी लागण्याचा आशीर्वाद मुळेकरांना मिळाला होता हे मुळेकर गाणगापुरास निघाले होते परंतु पैसे कमी होते म्हणून पैशाअभावी श्री स्वामींच्या दर्शनास जाताना त्यांनी नारळ न घेता एक पैशाच्या खारका घेतल्या श्री स्वामी समर्थांपुढे खारका ठेवून त्यांना नमस्कार केला तोच महाराज म्हणाले जा नारळ घेऊन ये मुळेकरांनी चार आण्याचा नारळ आणला श्री स्वामींपुढे ठेवून दर्शन घेतले त्यामुळे गाणगापूरला जाण्याचा प्रवासात चार आणे कमी पडू लागले पण त्यास गाणगापूरच्या प्रवासात महाराजांनी चार आण्याच्या दुप्पट आठ आणे दिले पैशाची तूट भरुन निघाली गाणगापूरची यात्रा करुन ते घरी आले श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे पोलिटिकल एजंट साहेबाच्या कचेरीत नोकरी अव्वल कारकून मामलेदार फर्स्टक्लास मामलेदार झाले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थ हे भक्तवत्सल तर आहेतच पण आपल्याकडे येणाऱ्या भक्तांची पूरेपूर काळजी घेणारेही आहेत गाणगापूरला दत्तप्रभूंच्या दर्शनास जाण्यासाठी मुळेकरांस पैशाची गरज होती म्हणूनच श्री स्वामी विषयी त्यांच्या मनात प्रेमभाव होताच परंतु प्रवासात पैसे कमी पडतील या चिंतेपोटीच त्यांनी श्री स्वामींपुढे नारळा ऐवजी खारका ठेवल्या श्री स्वामीं कडून या गोष्टींकडे दुर्लक्ष होईल म्हणून ते मुळेकरांना लगेच म्हणाले जा नारळ घेऊन ये नारळाविषयी मनात निर्माण झालेला भाव श्री स्वामींनी ओळखला याचे परम आश्चर्य मुळेकरास वाटले येथेही महाराज जा असे अगदी सहज म्हणाले यातूनही त्यांना मुळेकरास हेच सांगावयाचे होते की पुढच्या प्रवासाची काळजी का करतोस निश्चिंत राहा पुढे मुळेकरास श्री स्वामी महाराजांच्या या वचनाचा प्रत्यय चार आणे ऐवजी आठ आणे मिळून आलासुद्धा म्हणजे नारळासाठी चार आणे खर्च करावयास लावून आठ आण्याची प्राप्ती मुळेकरास श्री स्वामी समर्थांनी देऊन त्यास निःशंक केले हा झाला प्रवासात आलेला अनुभव पण पुढे त्यास सरकारात पक्की नोकरी लागून फर्स्टक्लास मामलेदारापर्यंत बढती मिळाली हा निश्चितच लाख रुपयाचाच लाभ आवडीने भावे हरिनाम घेसि तुझी सर्व चिंता त्यासी आहे याचा पडताळा ग.बा.मुळेकरांप्रमाणे आपणासही येऊ शकतो ह्याच स्वामीभक्त गं.बा.मुळेकरांनी श्री स्वामींच्या प्रत्यक्ष पाहिलेल्या ऐकलेल्या अनुभवलेल्या लीला पुस्तक रुपाने प्रसिद्ध करुन श्री स्वामी सेवेतून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न केला केवढी ही स्वामीभक्ती आणि कृतज्ञता.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या