श्री स्वामी समर्थ नरसप्पा सुताराकडे कधी गेले तर त्यांनी आपल्या घरी पुष्कळ दिवस राहवे असे त्यास नेहमीच वाटे एकदा श्री स्वामी आठ दिवस त्याच्या घरी मुक्कामास होते श्री स्वामी रात्री निघून जातील म्हणून तो घराच्या उंबर्यात निजत असे दिवस सुगीचे होते श्री स्वामी समर्थ घरी मुक्कामास असल्याने नरसाप्पास शेतावर जाता येईना सुगीच्या दिवसात नुकसान झाले तर कसे करावे असा त्यास प्रश्न पडून तो अस्वस्थ झाला त्याच्या अंतःकरणातील भाव आणि त्याची अस्वस्थता जाणून पहाटे चार वाजता श्री स्वामी समर्थ दरवाजा उघडून नरसाप्पाच्या घराबाहेर जाऊ लागले त्याने श्री स्वामींस न जाण्याविषयी पुष्कळ प्रार्थना केली पण सुगीचे दिवस आहेत तुला अडचण होते म्हणून आम्ही जातो असे म्हणून श्री स्वामी महाराज चालू लागले नरसप्पा सुतारास पश्चात्ताप झाला तो त्याच्या स्वतःच्याच तोंडात मारुन घेऊ लागला त्याने श्री स्वामी समर्थांच्या पायावर डोके ठेवून खूप विनवणी केली पण श्री स्वामी महाराज त्यावेळी त्याचे घरी परत गेलेच नाहीत.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

भगवान परब्रम्ह श्री स्वामी समर्थांनी नरसप्पा सुताराच्या घरी राहवे आसे त्यास वाटणे साहजिक आहे पण घर प्रपंच शेतीवाडीत अडकलेल्या त्या जीवाला सुगीच्या दिवसात श्री स्वामींचे त्याच्या घरी राहणे अडचणीचे नुकसानीचे वाटू लागले प्रपंचात खोलवर रुतलेल्यांना सुगीच्या दिवसात शेतातून उत्पन्न मिळणार होते म्हणून प्रत्यक्ष भगवंतही अडचणीचा वाटू लागतो श्री स्वामी समर्थांसारखे दैवत की प्रपंचातले गुरफटलेपण इथेच त्याची गल्लत झाली अशी गल्लत तुमची आमची अनेकांची अनेकदा होते तारुण्यात उद्योग व्यवसायात भरभराटीत सत्ता संपत्तीत आणि मस्तीत परमार्थ थोडा फार देव धर्म हे सहज जमले तर करायचे त्यास दुय्यम स्थान देव देव करणे हे प्रपंच उद्योग धंदा यास सदैव फार महत्त्व देणाऱ्यास परवडण्यासारखे वाटत नसते पण काहीही न करता देव देवाची कृपा मात्र त्यास हवी असते याचा अर्थ प्रपंच सोडून देव देव करा असा नाही प्रपंच नेटका करताना परमेश्वराचा विसर न व्हावा इतकेच या कथेतील सुगीच्या दिवसाचा विचार करणाऱ्या नरसाप्पास समृद्धीही हवी आणि श्री स्वामी महाराजही घरातून जाऊ नये या उथळ व स्वार्थी विचारापोटीच तो उंबर्यात निजून श्री स्वामींस रोखण्याचा प्रयत्न करतो नरसाप्पाची भक्ती होती परंतु ती परिपक्व झालेली नव्हती त्यात स्वार्थास प्राधान्य देण्याचा अंश होताच त्याची श्री स्वामींवर श्रद्धा होती पण तिचे निष्ठेत रुपांतर झालेले नव्हते तसे झाले असते तर तात्पुरत्या नफा नुकसानीचा विचार न करता सुगीच्या दिवसातही श्री स्वामी समर्थांसाठी तो घरीच थांबला असता प्रपंचात सुगीचे दिवस असताना देवाची अडचण वाटणे हे श्री स्वामी महाराजांना रुचले नाही नंतर त्यास जाणीव होऊन काय उपयोग संसार प्रपंच उद्योग धंदा व्यवसाय नोकरी यात आपण अडकलेलो असतो त्यात गुरफटलेलो असतो अडी अडचणी समस्या संकटे दुःख आदी प्रसंगी देवाची आठवण काढीत आसतो आणि ते स्वाभाविक आहे पण कधी कधी नरसाप्पासारखे सुगीचे आनंदाचे दिवसही वाट्याला येतात ते श्री स्वामी समर्थ कृपेने म्हणजे दैवी कृपेनेच आले हा मनोभाव असावा तेव्हाही देवासच प्राधान्य असावे नंतर इतर बाबी ह्या लीला भागाचा सूक्ष्मपणे विचार करुन त्यातून अर्थबोध करून घेणे व तशी कृती करणे एवढेच आपल्या हातात आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या