अक्कलकोटपासून आठ कोसांवर सोलापूर जिल्ह्यात बोरामणी नावाच्या गावात गणपतराव हुकीरे नावाचा वाणी जातीचा गृहस्थ राहात होता एके दिवशी त्याच्या तीन म्हशी चुकून नाहीशा झाल्या त्याने पुष्कळ शोध घेतला पण शोध लागेना अखेरीस त्याने श्री स्वामी समर्थांना नवस केला की महाराज जर माझ्या म्हशी सापडल्या तर त्यातील एक म्हैस तुमच्या चरणी अर्पण करीन किंवा म्हशीची किंमत अर्पण करीन श्री स्वामींच्या कृपेने त्यास त्याच्या म्हशी सापडल्या बोललेल्या नवसाप्रमाणे एका म्हशीच्या किंमतीच्या दोन समया घेऊन त्या चोळाप्पाकडे दिल्या पुढे एके दिवशी त्याने एक वांझ म्हैस उदारपणाचा आव आणून श्री स्वामी समर्थांना अर्पण केली श्री स्वामी समर्थ त्यास हसून म्हणाले आमची म्हैस तुझ्याकडेच राहू दे मग गणपतरावांनी ती म्हैस घरी आणली श्री स्वामी समर्थ कृपेने ती वांझ म्हैस पुष्कळ दूध देऊ लागली पण श्री स्वामीस अर्पण केलेली ती वांझ म्हैस होती ती स्वामींनी परत दिली त्यांच्या कृपेनेच ती भरपूर दूधही देऊ लागली या सार्या गोष्टींचा गणपतराव हुकीर्यास विसर पडला श्री स्वामींना नैवेद्य म्हणून दुधाचा एक थेंबही त्याने पाठविला नाही .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाकथेतील गणपतराव हुकीरेसारखे अनेक प्रापंचिक लोक सद्यःस्थितीतही आहेत काळ वेळ जरी बदलला तरी गरज सरो आणि वैद्य मरो कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई ही मानवी वृत्ती फारशी बदललेली नाही श्री स्वामी समर्थांच्या कृपेने हरवलेले सापडले गेलेले प्राप्त झाले श्री स्वामींमध्ये देण्याचे सामर्थ्य आहे यांची पुरेपूर जाणीव गणपतराव हुकीरे यास होती तरीही त्यांना वांझ म्हैस देण्याचा विचार त्याच्या मनात आला ही कोणती वृत्ती कोणता संस्कार यात कोणते साफल्य कोणता आनंद व तृप्ती याचे चिंतन करावयास लावणारी व आत्मबोध करुन घेण्यास भाग पाडणारी ही लीला आहे नवसाप्रमाणे तो वागतो नवस फेडतो म्हणजे नेमके आणि खरेखुरे काय करतो तर वांझ म्हैस देतो असे नवस बोलणारे ते फेडणारे अनेक आहेत भगवंतास ते का कळत नाही की दिसत नाही म्हणूनच श्री स्वामी समर्थ ह्या लीलेत म्हणतात म्हैस (वांझ) तुझ्याकडेच राहू दे असे वांझ भजन पूजन समर्पण करणाऱ्यांची उपासनाही वांझोटीच असते परंतु भगवंत हुशार आहे तो म्हशीलाही दुधाळ बनवितो भगवंताच्या श्रेष्ठत्वाची व कृपेची कृतज्ञताच अंगी न भिनलेल्या गणपन हुकीर्यास दुधाळलेल्या म्हशीच्या दुधाचा नैवेद्य श्री स्वामींस दाखविण्याची सुध्दा इच्छा होऊ नये हा केवढा कर्मदरिद्रीपणा हे सर्वच चिंतनीय आणि विचार करायला लावणारे आहे .

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या