गिरी पुरी भारती हे तिघे गोसावी श्री स्वामी समर्थांना नमस्कार वगैरे काही ही न करता विश्वनाथ श्रीपाद भट यास विचारु लागले हे स्वामी कोठील कोण हंस की परमहंस संन्यासी असून पलंग गाद्या गिरद्या आहेत यांचा दंड कोठे आहे हा मार्ग कोणत्या शास्त्रात प्रतिपादन केला आहे कोणत्या शास्त्राचे याला प्रमाण आहे असे उद्धटपणे विचारु लागले श्रीपाद भट त्यांना म्हणाले तुम्ही श्री स्वामींपुढे जा आणि त्यांनाच विचारा म्हणजे तुम्हास समजेल असे ऐकून ते तिघे गोसावी श्री स्वामी समर्थांच्यापुढे गेले तो त्यांच्या जीभा जड पडून तिघांचीही वाचा बंद झाली एकालाही बोलता येईना मग काय विचारता श्री स्वामींचे दिव्य तेज त्यांच्या दृष्टीला सहन होईना ते घळाघळा रडू लागले लोटांगणे घालू लागले त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या गर्वहरण झालेल्या तिघांनाही श्री स्वामींनी जिभा बाहेर काढावयास लावल्या त्यावर थोडे थोडे भस्म टाकताच त्यांना पूर्ववत वाणी प्राप्त झाली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीला कथाभागातील गिरी पुरी आणि भारती हे तिघेही गोसावी त्यांनी प्राप्त केलेल्या विद्येने अतिशय उन्मत्त झाले होते माजले होते ते कुणाचीही भीडभाड न ठेवता पाणउतारा करीत असत त्यातच त्यांना त्यांच्या विद्धत्तेचा गर्व वाटत होता त्यांना त्यांच्या मर्यादा माहीत नसल्यामुळेच त्यांनी प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामी समर्थांबद्दल हे स्वामी कोठील कोण हंस की परमहंस संन्यासी असून पलंग गाद्या गिरद्या आहेत यांचा दंड कोठे आहे हा मार्ग कोणत्या शास्त्रात प्रतिपादन केला आहे कोणत्या शास्त्राचे याला प्रमाण आहे असे उद्धट उदगार काढले सहस्त्तकोटी सूर्या ऐसी प्रभा म्हणजे तेज असणाऱ्या श्री स्वामी समर्थांपुढे ते तिघे येताच उद्धटपणाने वरीलप्रमाणे बडबड करणाऱ्या त्यांच्या जिभा टाळ्याला चिटकल्या जड पडल्या त्यांची उद्धट वाचाळ बडबड एकदम बंद झाली त्यांची दातखीळच बसली त्यांच्या अंगाला दरदरुन घाम सुटला स्वतः त्यांनाच आपण कोण कोठील कशा करता आणि येथे कोठे आलो असे प्रश्न पडले त्यांच्या गर्विष्ठपणाची ज्ञानाच्या उन्मत्तपणाची त्यांना किती कठोर शिक्षा झाली होऊ शकते याचा आपणही बोध घेण्यासारखा आहे सद्यःस्थितीतही अशा वर्तनाची अशी शिक्षा कमी अधिक प्रमाणात मिळू शकते म्हणून नम्र झाला भूता तेणे कोंडीले अनंता किंवा महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती असे वर्तन ठेवण्यास कुठलीही अडचण नसावी दयाघन श्री स्वामींनी त्यांना त्याची वाचा परत मिळवून दिली आपल्या हातूनही कळत नकळत काही अपराध घडला चुका झाल्या तर श्री स्वामीरायांना मनोभावे शरण जाण्यास कोणता कमीपणा अहंभाव मग तो कोणाताही का असेना तो बुद्धिभ्रष्ट करतो शिक्षेस पात्र ठरवितो म्हणून त्यापासून शेकडो मैल दूर राहणे हेच आपल्या अंतिम हिताचे हाच महत्त्वाचा अर्थबोध.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या