एक तरुण मारवाडी श्री स्वामीरायांच्या सेवेत तीन वर्षे येऊन राहिला त्याच्या घरची वारंवार पत्रे येऊनही तो घरी गेला नाही तीन वर्षांनंतर त्याचा बाप व चुलता त्याला नेण्याकरिता आले त्यांनी चोळाप्पाकरवी श्री स्वामींस मुलास परत नेण्याची आज्ञा मागितली त्यावर श्री स्वामी त्या मारवाड्यास म्हणाले आपले घरी जा व कधी कधी इथे येत जा श्री स्वामींची आज्ञा होताच श्री स्वामी महारवाड्यात असताना त्यांचे त्या तिघांनी दर्शन घेऊन श्री स्वामींस विनंती केली की आता आम्ही देशाला जातो आमच्यावर कृपा असावी तेव्हा तो तरुण मारवाडी श्री स्वामींच्या वारंवार पाया पडून हे पाय आता आम्हाला अंतरले कृपा करुन महाराज पायांचे दर्शन कधी कधी देत जा आणि मला काही प्रसाद द्या त्याची विनंती ऐकून श्री स्वामी महाराज त्यास म्हणाले येथे देणे घेणे व्यापार काही नाही प्रसाद पाहिजे असल्यास त्या हाडकातून चार हाडके घेऊन जा समोरच असलेल्या हाडांच्या ढिगार्यातून त्या तरुण मारवाड्याने भीत भीत चार हाडे एका फडक्यात बांधून घेतली नंतर ते तिघेही त्यांच्या घरी आले आणलेले हाडकांचे गाठोडे घराबाहेर ठेवले दुसरे दिवशी सकाळी ते गाठोडे उचलू लागला तर ते त्याला जड लागले गाठोडे सोडून पाहिले तर हाडका ऐवजी सोने त्याच्या दृष्टीस पडले त्या तरुण मारवाड्यासह सर्वांनाच आनंद झाला त्याच्या तीन वर्षांच्या श्री स्वामी दरबारातील चाकरीबद्दल (सेवेबद्दल) त्यास चौपट प्रमाणात मिळाले पुन्हा तो मारवाडी अक्कलकोटी येऊन त्यातील १० तोळे सोने श्री स्वामींपुढे ठेवून त्यांना दंडवत घातले तो स्वामीरायांचा एकनिष्ठ दास बनला त्याची श्री स्वामींप्रती भक्ती वाढून त्याच्या गावी त्याची कीर्ती पसरली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

तरुण मारवाड्याचा श्री स्वामी समर्थांप्रती सेवाभाव आणि निष्ठा होती त्याला परत बोलावणार्या घरुन येणाऱ्या पत्रास त्याने तीन वर्षे दाद दिली नाही अखेर त्याचे वडील आणि चुलते अक्कलकोटी आले त्यांनी चोळाप्पाकरवी त्या तरुण मारवाड्यास श्री स्वामींकडून घरी नेण्याची परवानगी मिळवली श्री स्वामींनी आपले घरी जा व कधी कधी इथे येत जा अशी सूचनाही केली तो अगोदर जाण्यास तयार नव्हता परंतु त्याचे पूर्वकर्म आणि संचित प्रारब्ध त्याला अधिक काळ श्री स्वामी सहवासात राहून त्यांची सेवा करण्याचे भाग्य मिळवून देणारे नव्हते म्हणूनच त्याचे वडील आणि चुलते त्याला नेण्यास आले श्री स्वामींना हे सर्व ज्ञात होते म्हणून ते तरुण मारवाड्यास म्हणाले आपले घरी जा व कधी कधी इथे येत जा या लीलेतील त्या तिघांनी श्री स्वामींस केलेली विनंती मनोज्ञ आहे फक्त त्या तरुण मारवाड्याने केलेली प्रसादाची मागणी श्री स्वामी समर्थांच्या सेवेत तीन वर्षे राहूनही त्याचा जीव मोह माया ममता इच्छा अपेक्षा याने कसा माखलेला होता याचा बोध करुन देणारी आहे येथे तो तरुण मारवाडी काहीसा चुकलाच संसार प्रपंच पैसा अडका सोने नाणे हे सर्व अंतिमतः नाशवंत आहेत त्याची किंमत ती किती हाडा इतकी याचा अर्थ संसार करुच नका सोने नाणे घालूच नका असा नाही पण त्याचा अतिरिक्त सोस नको त्याला वासनेचे आच्छादन नको श्री स्वामींनी त्यास परखडपणे सांगितले येथे देणे घेणे व्यापार काही नाही प्रसाद पाहिजे असल्यास त्या हाडकातून चार हाडके घेऊन जा श्री स्वामींच्या या वाक्यात खूप मोठा अर्थ भावार्थ मथितार्थ आणि बोधही दडलेला आहे पण श्री स्वामी सहवास व सेवेत तीन वर्षे राहूनही तो त्यास उमगला नाही तुमच्यासारखा असंख्यांची अशीच अवस्था अनेकदा होत असते हे इथले आत्मपरीक्षण आणि आत्मनिरीक्षण आहे श्री स्वामी कुणाच्याही ऋणात राहत नसत त्याने भीत भीत उचललेल्या हाडाचे सोने झाले त्याला त्याच्या श्री स्वामींच्या सेवेच्या चारपट मिळाले भक्ती त्याच्या चारपट प्राप्ती हे दाखविणारी ही लीला आहे तेव्हा एकतर श्री स्वामींची सेवा निरपेक्ष निर्मोही वृत्तीने करीत राहवी योग्य वेळी श्री स्वामी सेवेचे काही ना काही फळ देतातच हा विश्वास बाळगावा.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या