श्री स्वामी समर्थांनीच आपल्यावर म्हातारपणी येऊ पाहणारी तोहमत टाळली ठरविल्याप्रमाणे सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मैंदर्गीचा तो मुसलमान जमादार अक्कलकोटास येऊन श्री स्वामींचे चरणी लागला सर्वसंग परित्याग करुन तो श्री स्वामींच्या सेवेत तत्पर राहिला रोज दुपारी १२ वाजता श्री स्वामींच्या आज्ञेने त्यास दोन भाकरी मिळू लागल्या आठ दिवसांनंतर लोभी चोळाप्पास त्या दोन भाकर्या देण्याचेही जड वाटू लागले तो जमादारास श्री स्वामी समर्थांजवळ जाण्यास मनाई करु लागला आता जमादार लांब बसू लागला हे श्री स्वामींच्या लक्षात आल्यावर त्यांनी जमादारास जवळ बोलाविले आपल्या पायातील जोडा त्याच्या अंगावर फेकून त्यास गावी (मैंदर्गीस) जाण्याची आज्ञा दिली श्री स्वामी समर्थांचा तो प्रसाद (जोडा) शिरसावंद्य मानून मोठ्या आनंदाने तो मैंदर्गीस आला श्री स्वामींनी दिलेल्या त्या चर्मपादुका घरात ठेवून मोठ्या भक्तिभावाने तो त्यांची पूजा करु लागला हिंदू साधूच्या जोड्यांची पूजा करण्याचे हे कृत्य जमादाराच्या बायका पोरांना रुचले नाही म्हणून सर्वांनी त्यास घराबाहेर घालवून दिले बोहरच्या पडक्या घरात तो एकटाच राहू लागला श्री स्वामी कृपेने त्यास गावातून आयते भोजन मिळू लागले श्री स्वामीभक्त म्हणून तो पुढे प्रसिद्ध झाला त्याची कीर्ती ऐकून व्याधिग्रस्त पीडित दुःखी त्याचेकडे येऊ लागले श्री स्वामी समर्थांच्या त्या चर्मपादुकां- खालील माती तो येणाऱ्या दुःखी पीडित व व्याधी ग्रस्तांना देऊ लागला रोगी बरे होऊ लागले तो मोठा सिध्दपुरुष बनला ब्राम्हणही त्यास वंदन करु लागले तो नेहमी अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास जात आसे श्री स्वामी महाराज त्यास पीरसाहेब या नावाने हाक मारीत आता त्यास द्रव्यही पुष्कळ मिळू लागले ज्या कुटुंबियांनी त्यास अपमानित करुन घराबाहेर घालविले होते आता त्यांनीच त्यास मोठ्या प्रेमाने व सन्मानाने पादुकांसह घरी नेले त्याची बायकोही त्याची सेवा करु लागली त्याने मैंदर्गी येथे देऊळ बांधले त्यात त्या चर्मपादुकांची स्थापना केली पुढे त्याचेही पुष्कळ शिष्य झाले श्री स्वामी समर्थ कृपेमुळे एक साधा सरकारी नोकरी करणारा मुस्लिम जमादार अवलिया झाला नंतर तो गावीच समाधिस्थ झाला .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थ कृपेमुळेच मैंदर्गीच्या त्या मुस्लिम जमादारावर येऊ पाहणारी तोहमत टळली दिलेल्या वचनाप्रमाणे कुठलाही विचार न करता केवळ श्री स्वामी भरवशावर आणि त्यांच्यावरील अपार निष्ठेवर त्याने सरकारी नोकरीचा राजीनामा दिला सर्वसंगपरित्याग करुन श्री स्वामींच्या आश्रयास आणि सेवेस तो अक्कलकोटला आला केवढी जबरदस्त ही स्वामीनिष्ठा परंतु श्री स्वामींच्याही अवती भवती चोळाप्पा सुंदराबाईसारखे लोभी होते अंतःसाक्षी श्री स्वामींच्या हे सर्व लक्षात आले होते त्यांना त्या मुस्लिम जमादाराची निस्सीम भक्ती ठाऊक होती त्या जमादाराचे पुढे काय करायचे याचेही श्री स्वामींनी नियोजन करुन ठेवले होते त्यांनी कृपाप्रसाद म्हणून त्याच्या अंगावर त्यांच्या स्वतःच्या पायातील चर्मपादुका फेकल्या या चर्मपादुका हा श्री स्वामींचा प्रसाद समजून त्या तो मैंदर्गीस घरी घेऊन आला त्याचे कुटुंबिय हे तुमच्या माझ्यासारखेच सर्व  सामान्य षडरिपू लिप्त असलेले जीव त्यांना ना श्री स्वामी समर्थांचे देवत्व कळले ना जमादाराची स्वामी भक्ती या अज्ञानातूनच त्यांनी त्यास घराबाहेर घालविले परंतु त्या पीरसाहेबांचे अवलियापण जेव्हा त्यांना समजले व उमजले तेव्हा त्यांच्यातल्या स्वार्थ बुध्दीने पीरसाहेबास सन्मानाने घरात घेतले यात भक्तीबद्दल जिव्हाळा आणि प्रेम किती स्वार्थ किती आपमतलबीपणा किती याचा आत्मबोध करुन देणारी ही लीला आहे पण आज किती जण या जमादाराच्या आजच्या वंशजांकडे जातात व त्या चर्म पादुकांचे दर्शन घेतात म्हणजे आमचीही भक्ती बेगडीच.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या