बडोद्याचे (गुजरात ) अळवणीबुवा एकदा तीन सेवेकर्यांसह जगन्नाथपुरीस गेले तेथे इतके आजारी पडले की बाजारातून शिधा आणण्याचे सामर्थ्यही त्यांच्यात राहिले नाही अशा स्थितीत श्री स्वामी समर्थ कटीवर हात ठेवून अळवणीबुवांचे पुढे उभे राहिले त्याही स्थितीत अळवणीबुवा खडबडून उठले श्री स्वामींची स्तुती करुन बुवांनी श्री स्वामींस विचारले आपण कोठे असता त्यावर श्री स्वामी उत्तरले सर्व स्थाने आमचीच आहेत आम्ही सर्वत्र असतो असे म्हणून ते दिसेनासे झाले हे पाहून बुवास मोठे आश्चर्य वाटले पलीकडच्या बाजूस पक्वान्नांनी भरलेली पात्रे बुवांस दिसली शिष्यांसह त्यांनी यथेच्छ भोजन केले बुवांनी श्री स्वामींस पुन्हा दर्शन व्हावे अशी विनंती करताच श्री स्वामी म्हणाले आम्ही अक्कलकोटास असून तेथे भेट होईल चिंता करु नये पुढे काही दिवसांनी अळवणीबुवा फिरत फिरत अक्कलकोटास आले व जगन्नाथपुरी पाहिलेली ती मूर्ती हिच आशी ओळख पटताच बुवास प्रेम आवरेना श्री स्वामी समर्थांस साष्टांग नमस्कार करुन काही दिवस श्री स्वामींची यथाशक्ति त्यांनी सेवा केली नंतर ते मार्गस्थ झाले .
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
या अगोरच्या लीलेतील अर्थबोधात स्पष्ट केल्याप्रमाणे येथे श्री स्वामी समर्थांच्या सर्वसाक्षित्वाची आणि विश्वव्यापकतेची कल्पना या लीलेतही येते अन्नपुर्णा देवीही त्यांच्या अधिपत्याखाली असल्यामुळे बुवांसह त्यांच्या शिष्यास ते पक्वान्ने खाऊ घालू शकल्याचेही येथे बोधित होते आम्ही सर्वत्र असतो सर्व स्थाने आमचीच आहेत यातून श्री स्वामी समर्थांचे सर्वव्यापी देवत्व सूचित होते या संदर्भात ब्रम्हनिष्ठ वामनबुवा वैद्यांनी लिहिलेल्या श्री गुरुलीलामृतातील पुढील श्लोक श्री वास विश्वाधिष्ठान हेचि खास अभिन्न स्थान आमुचे तथापि तुम्हासि व्हावे श्रत यदर्थ सांगू यथार्थ विहित आमचे स्थान सह्याद्रीपर्वत आणि गिरनार पर्वत जाणावे काशीक्षेत्र मातापूर करवीर पांचालेश्वर नगर कुरवपूर औदुंबर करंजनगर इत्यादी नृसिंहवाडी गाणगापूर कुरुक्षेत्र हरिव्दार हिमालय आणि रामेश्वर व्दारका नगरी विख्यात विज्ञान नित्य गंगास्नान अव्दैत परमामृत प्राशन तुंगभद्रा प्रवरापान भीक्षाटन सर्वत्र अभी श्रीगिरी अनेक मेरुपर्वत गिरीकर्णिक अंबा काली सरस्वत्यादिक अनंत स्थाने आमुची अष्टविनायक वक्रतुंड ब्रम्हाकपाट केदारकुंड आमुचे स्थान पिंड ब्रम्हांड व्दादश ज्योतिर्लिंगादि तीर्थक्षेत्र देव संस्थानअखिल संपूर्ण आमुचे निजस्थान सर्वत्र व्यापक निर्मल चिरकाल भटको स्वतः सिध्द (श्री गुरुलीलामृत अ.६.श्लो.४५.ते ५२ पृ.क्र.७९.८०) यावरुन श्री स्वामी समर्थांच्या बहुव्यापक अस्तित्वाची साक्ष देण्यासाठी अजून काय हवे.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या