केज (जि.बीड) महारुद्रराव देशपांडे या धनिकाचे फार मोठे उत्पन्न त्यावेळच्या निजाम सरकारने जप्त केले ते सुटण्यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले पण ते सर्व व्यर्थ गेले तेव्हा  ते बीडच्या खडकीकर साधूकडे गेले त्यांना सर्व हकीकत सांगितली ते साधू म्हणाले अक्कलकोटी श्री परमहंस स्वामी आहेत त्यांच्याकडे जा म्हणजे तुमचे कार्य होईल असे वाटते त्यानुसार महारुद्रराव देशपांडे अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थांपुढे श्रीफळ आदि ठेवले साष्टांग नमस्कार केला आणि उभे राहिले इतक्यात श्री स्वामी समर्थ म्हणाले चार मनोरे आहेत तेथे जा म्हणजे तुमचे शेत सोडून देऊ श्री स्वामींचे हे अंतःसाक्षित्वाचे बोलणे ऐकून देशपांडे यास मोठे आश्चर्य वाटले श्री स्वामी समर्थांची आज्ञा घेऊन मोठया त्वरेने ते हैद्राबादेस आले त्याच दिवशी जप्त केलेले उत्पन्न सोडून देण्याचा सरकारातून हुकूम झाला होता हे ऐकून देशपांड्यास परमानंद होऊन ते श्री स्वामी समर्थांचे गुणानुवाद गात अक्कलकोटी आले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

महारुद्रराव देशपांडे यांचे मोठे उत्पन्न जप्त झाल्यावर त्यांना परमेश्वराची तीव्रतेने आठवण झाली कुणाही कोणत्याही धर्माचा पंथाचा माणूस संकटात सापडल्यावरच इष्ट देवदेवतेचे स्मरण धावा करतो तेच येथे देशपांडे यांनी केले मदत मार्गदर्शन मिळावे म्हणून ते बीडच्या साधूकडे आले त्या  साधूस श्री स्वामी समर्थांची महती ठाऊक होती म्हणून त्यांनी पण महारुद्ररावास अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांकडे जाण्यास सांगितले यावरुन श्री स्वामी समर्थांचा अधिकार फार मोठा होता हेही स्पष्ट होते महारुद्रराव देशपांड्यांना बघताच श्री स्वामी स्पष्टपणे सांगतात मनोरे आहेत तेथे जा म्हणजे शेत सोडवून देऊ (चार मनोरे म्हणजे हैद्राबाद ) हे ऐकून देशपांडे हैद्राबादला येतात श्री स्वामींच्या उदगाराची प्रचिती त्यांना हैद्राबादला पोहोचताच क्षणी येते कारण त्यांचे जप्त झालेले उत्पन्न मुक्त करण्याचा हुकूम सरकारातून झालेला असतो श्री स्वामी समर्थांच्या सामर्थ्याची त्यांच्या कृपेची प्रचिती देणाऱ्या अनेक लीलांमधील ही एक लीला आहे .

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या