सरदार तात्यासाहेब हर्षे व त्यांच्या सहकारी मंडळींनी श्री स्वामी समर्थांना मेण्यात घालून गुपचूप कडपगाव रेल्वे स्टेशनपर्यंत न्यायचे तेथे आगगाडी तयार ठेवून श्री स्वामींना रेल्वेतून लगेच बडोद्यास घेऊन जायचे अशी योजना आखली होती ती सर्वांना आवडली होती त्यानुसार चोळाप्पाने सांगावे महाराज चला हवा खाण्यास जाऊ महाराजांचे उत्तर नाही रे मग जाऊ सुंदराबाईने म्हणावे महाराज चला राजवाड्यात जाऊ नाही गं उद्या जाऊ महाराजांचे उत्तर पुन्हा चोळाप्पाने म्हणावे महाराज चला खासबागेत जाऊ ऊन कमी झाल्यावर जाऊ महाराजांचे उत्तर अशा स्थितीत तीन चार दिवस गेले लोकांनी काही तरी विचारुन श्री स्वामींचा पिच्छा पुरवला त्यांनीही लोकांना वरील स्वरुपाची उत्तरे देऊन टोलवा टोलवी केली असे करता करता सर्व मंडळी थकली सेवेकर्यांना वश करण्यासाठी सरदार तात्यासाहेब हर्षे कोणाला धोतर जोडा कोणाला शालजोडी कोणाला दहा किंवा वीस रुपये अशी लालूच दाखवून आपलेसे करण्याचे प्रयत्न करीत होते असे करता करता एके दिवशी श्री स्वामी समर्थ मेण्यात बसले योजना फत्ते झाल्याचा सर्वांना अत्यानंद झाला कडपगाव रेल्वे स्टेशनवर आगगाडी तयार होतीच अक्कलकोटपासून कोसभर आबाची वाडीपर्यंत मेणा आला इतक्यात मेण्याचे भोई सांगू लागले की मेणा हलका लागतो मेणा खाली ठेवून पाहतात तर मेण्यात श्री स्वामी समर्थ नाहीत सर्वांना परम आश्चर्य वाटले दोन घटकांनंतर जेऊर गावाहून एक पोस्ट शिपाई हाका मारीत आला अहो येथे काय करता महाराज जेऊरचे वाटेत येथून सुमारे दोन कोस एका दगडावर बसले आहेत मी विचारले महाराज अक्कलकोटास येता काय तर म्हणाले नाही रे मी तसाच धावत आलो तो तुम्ही येथे भेटला त्या सर्वांना एका दमात त्या पोस्ट शिपायाने सांगून टाकले पोस्ट शिपायाचे वरील बोलणे ऐकताच सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांजवळ जाऊन त्यांना साष्टांग नमस्कार घातला ते सर्वजण क्षमा याचना करु लागले शरमिंदे होऊन नाकदुर्या काढू लागले म्हणू लागले की आम्ही द्रव्याच्या आशेत गुंतून आपले सामर्थ्य न जाणून असे अपकृत्य केले महाराज अपराधाची क्षमा असावी त्यातील कुणी कान उपटून घेत होते तर कुणी पश्चात्तापाने स्वतःच्याच तोंडात मारुन घेत होते त्या सर्वांची अशी फजिती पाहून श्री स्वामी समर्थ महाराज पोट धरधरुन हसू लागले हजारो रुपये खर्चून शेवटी हताश होऊन आणि अपयश पदरी घेऊन तात्यासाहेब हर्षे माघारी आले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांच्या देवत्वाला आणि सामर्थ्याला न ओळखण्याचे घोडचूक सरदार तात्यासाहेब हर्षे यांनी केली होती श्री स्वामी हे प्रत्यक्ष दत्तप्रभूंचा अवतार असूनही त्यांच्या सहवासातील चोळाप्पा सुंदराबाई व अन्य सेवेकरी मंडळी त्यांना सामान्य माणसाप्रमाणे समजत होती काय म्हणावे या अज्ञानास एखाद्या महान विभूतीचे देवत्वासमान मूल्य (मोल) न जाणून आपण अडाणीप्रापंचिक जीव काय योजना क्लृप्त्या वापरतो हे सर्व करीत असताना आपण अध्यात्माच्या अज्ञानाच्या अंधारात कसे चाचपडतो ठेचाळतो याचेही भान आपणा सर्वांस अनेकदा राहत नाही मतलब स्वार्थ स्वतःची बढाई आदि कुचकामी गोष्टी कशा अंध बनवतात त्याची बोलकी कृती म्हणजे ही लीला आहे शेवटी सर्वांनाच पश्चात्ताप झाला अपराधाची जाणीव झाली हे ही नसे थोडके श्री स्वामी समर्थांना मानवी जीवाच्या ह्या सर्व भावना त्यातील उथळपणा क्षणभंगुरता जाणवत होती परंतु ते तर करुणानिधी करुणासागर ते कुणावरही चकार शब्दाने न रागवता सामान्य जीवांची ती केविलवाणी स्थिती पाहून पोट धरधरुन हसत होते सर्वांना क्षमा करुन अक्कलकोटला घेऊन आले धन्य ते स्वामी समर्थ येथे आपणच आपली कीव करावयाची यातून बोध घेऊन निर्गुण निराकार स्वरुपात सद्यःस्थितीतही वावरणार्या श्री स्वामी रायांची निरपेक्ष शुद्ध पवित्र अंतःकरणाने उपासना करायची आपल्या शुध्द आचार विचार आणि व्यवहाराने श्री स्वामींच्या कृपेस पात्र होण्याचा प्रयत्न करायचा बस्स इतकेच आपल्या हातात आहे बाकी त्यांच्यावर सोपवायचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा ते देणारच यात तिळमात्र शंका नाही.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या