नित्यनेमाने तो ब्राम्हण श्री स्वामी महाराजांसाठी त्या आम्रवृक्षाखाली नैवेद्य ठेवीत असे त्या नैवेद्याचे अन.श्री स्वामींऐवजी एक पिशाच्च भक्षण करीत असे त्या ब्राम्हणास असे वाटे की तो त्या वृक्षाखाली दररोज ठेवीत असलेला नैवेद्य कोण भक्षण करतो महाराज तर येथे नाहीत हा काम चमत्कार आहे असे वाटून तो श्री स्वामी समर्थांचा धावा करु लागला आणि अखेरीस तो रामेश्वराचे दर्शनास गेला तेव्हा तेथे बघतो तर त्याला रामेश्वराच्या लिंगाचे ठिकाणी श्री स्वामी समर्थ दृष्टीस पडले त्यास आश्चर्य वाटून त्याने श्री स्वामींस साष्टांग नमस्कार घातला आणि तो त्याच्या मुलास हाक मारु लागला त्यावर त्याच्या मुलाने उत्तर दिले श्री स्वामी समर्थांच्या पुढे येण्यास मला भीती वाटते कारण त्यास पाहताच मी मरेन असे सांगून तो मुलगा थरथर कापू लागला मग त्या ब्राम्हणाने जबरदस्तीने त्यास ओढून आणून श्री स्वामी समर्थांच्या पुढे उभे केले तेव्हा तो ओरडून सांगू लागला की महाराज मला मारु नका मला मुक्ती द्या असे म्हणून तो जमिनीवर पडला व गतप्राण झाला तेव्हा त्याचे शरीर दहा हात उंच होऊन अक्राळविक्राळ दिसू लागले त्या ब्राम्हणाने व त्याच्या पत्नीने रडून रडून आकांत केला त्यांनी श्री स्वामींना प्रार्थनापूर्वक विचारले की महाराज आपण दिलेला मुलगा मृत कसा झाला महाराज आपल्या आशीर्वादाचे फळ विपरीत का झाले असे म्हणून ते श्री स्वामीचरणाशी लोळू लागले त्यावर महाराज म्हणाले आम्ही पूर्वीच तुम्हाला पुत्र होईल जाईल असे संगितले होते उगीच रडू नका तू वृक्षाखाली ठेवत असलेला नैवेद्य भक्षण करणारे पिशाच्च होते तेच तुमचा मुलगा झाले आम्ही त्याला त्या योनीतून मुक्त केले जा आता त्या प्रेताचे दहन करा
अर्थ / भावार्थ / मथितार्थ
श्री स्वामी समर्थांसाठी त्या आम्रवृक्षाखाली तो ब्राम्हण नित्य नियमाने नैवेद्य ठेवत असे परंतु त्या वृक्षावर एक पिशाच्च होते हे त्यास माहित नव्हते श्री स्वामी समर्थच कदाचित ठेवत असलेला तो नैवेद्य स्वीकारीत असावेत अशा समजुतीने तो नित्य नेमाने नैवेद्य ठेवत असे त्या दरम्यानच्या काळात त्यास पुत्र होईल जाईल श्री स्वामींच्या वचनाची फलश्रुती म्हणून पुत्र झाला होता श्री स्वामींस प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानावे म्हणून त्याने श्री स्वामींची खूप वाट पाहिले परंतु श्री स्वामी महाराज तर येथे नाहीत म्हणून श्री स्वामी समर्थांचा धावा करीत तो रामेश्वराच्या मंदिरात आला तेथे त्यास रामेश्वराच्या लिंगाऐवजी श्री स्वामी समर्थ दिसले त्याला खूप आश्चर्य वाटले त्या मंदिरात तो त्याच्या मुलासही श्री स्वामींच्या दर्शनासाठी हाका मारु लागला पण त्याचा तो मुलगा पिशाच्च स्वरुपात असल्यामुळे मृत्यूच्या भीतीने पुढे येईना पुढे त्यास जबरदस्तीने श्री स्वामींपूढे आणताच त्या मुलाने ओरडून प्राण सोडला त्याला श्री स्वामी दर्शनाने मोक्ष (मुक्ती )मिळाला तो मुलगा म्हणजे पिशाच्चाचे स्वरूप होते याची त्या ब्राम्हणास व त्याच्या पत्नीस कल्पना नव्हती त्यामुळे पुत्रवियोगाने त्या दोन्ही प्रापंचिक जीवांनी रडून रडून आकांत मांडला आणि ते साहजिकही आहे हेच तर सर्वसामान्यांचे घोर अज्ञान आहे आपली मुले मुली संसार प्रपंच स्थावर मालमत्ता यातली क्षणभंगुरता अथवा नाशवंतपणा मानवास अखेरपर्यंत उलगडत नाही हेच मानवाचे अपुरेपण आहे
श्री स्वामी समर्थ
Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या