एके दिवशी श्री स्वामी समर्थ रामाच्या देवळात असताना आकाश ढगांनी व्याप्त होऊन जिकडे तिकडे पावसाची गर्दी झाली इतक्यात श्री स्वामी महाराज म्हणाले मेणा लाव सोबतच्या सेवेकर्यांनी प्रार्थना केली की महाराज पाऊस पडत आहे लोक भिजतील श्री स्वामींनी कुणाचेही न ऐकता मेणा आणवला भर पावसात मेणा निघाला सगळे लोक भिजले महाराज मात्र हसत हसत इंद्र महाराज चले इदल मे बिजली चमके बादल मे असे गाणे म्हणत बागेतून चोळाप्पाच्या घरी आले.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
वरील लीला वाचणार्यास श्री स्वामी समर्थांची ही साधी सरळ लीला वाटेल परंतु श्री स्वामींच्या साध्या कृतीत आणि बोलण्यातही मोठा अर्थबोध दडलेला असे सेवेकरी पावसाळी वातावरण बघून भिजण्याच्या भीतीने बाहेर पडण्यास नाखुष होते वास्तविक श्री स्वामी समर्थांसारखा ईश्वरी पाठीराखा संरक्षण कर्ता सोबतीला असताना त्या सर्वांनी पावसाला काय पण अन्य कोणत्याही संकटास घाबरण्याचे कारण नव्हते परंतु त्यांचे श्री स्वामींच्या ईश्वरी अवताराबाबत आकलन तोकडे होते वास्तविक पावसात भिजणे तशी फारशी कष्टदायक गोष्ट नव्हती पण अनादिकाळापासून चालत आलेला मानवी स्वभावधर्म म्हणजे सुरक्षितता त्रास नको सहज आरामशीर विनाकष्टाने सारे काही मिळावे अगदी परमेश्वरसुध्दा मेणा लाव अशी ते आज्ञा करतात तेव्हा सेवेकरी कुरकुरतात लोक भिजतील असेही ते सांगतात पण ते पुन्हा म्हणाले मेणा लाव सेवेकर्यांना आज्ञा निमूटपणे पाळावी लागते आणलेल्या मेण्यात ते बसतात व म्हणतात इंद्र महाराज चले इदल मे त्यांच्या या उदगारात इंद्राचा उल्लेख आहे इंद्र हा देवांचा राजा तो आधिभौतिक आधिदैविक आणि आध्यात्मिक या त्रिविध ऐश्वर्याचा भोग घेत असतो त्याचप्रमाणे सध्याच्या दृष्य जगातही प्रत्येक जीव या त्रिविध ऐश्वर्याचा भोग कमी अधिक प्रमाणात अखंड घेत असतो मृत्यूद्वारे अखेर संपतो इदल में म्हणजे श्वासोच्छवास क्रियेतील इडा व पिंगला या नाड्या होत श्वासोच्छवासाद्वारे जन्म मृत्यूची ये जा करीत जीव भ्रमण करीत असतो परंतु त्या जीवास म्हणजे तुम्हा आम्हास संसार प्रपंचात असूनही जेव्हा वैराग्य मोह ममता माया विरहित अवस्था प्राप्त होते तेव्हा श्री स्वामींनीच म्हटल्याप्रमाणे बिजली चमके बादल में हा अनुभव तुम्हा आम्हाला घेता येतो जीवनात एक सुखद परिपूर्तीचा आणि आनंदाचा अनुभव येतो म्हणून तर श्री स्वामी समर्थ हसत हसत आनंदाने म्हणतात इंद्र महाराज चले इदल में बिजली चमके बादल में त्यांनी केलेले हे भाष्य किती अर्थपूर्ण आणि बोधप्रद आहे याची कल्पना येते भिजत कष्टत जरी जीवनक्रम चालत असला तरी श्री स्वामी समर्थ स्मरणाने अंतिमत इंद्र महाराज चले इदल में बिजली चमके बादल में म्हणजे शेवटचा दीस गोड या उक्तीप्रमाणे अंतिमत आनंदही आनंद हा इथला बोध आहे पण त्यासाठी हवी श्री स्वामी समर्थांवर दृढ निष्ठा प्रखर निर्मोही निखळ निर्मळ पवित्र उपासना.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या