एक गोसावी विविध तीर्थक्षेत्र फिरता फिरता रामेश्वरी आला तेथे त्याला जलोदर झाला त्यामुळे दिवसेंदिवस त्याची शक्ती क्षीण झाली त्यामुळे त्याला पुढे तीर्थयात्रा करता येईना म्हणून तो चिंतेत असताना एका संन्याशाचा त्यास स्वप्नदृष्टांत झाला अक्कलकोटी जा तुला आरोग्य होईल असे स्वप्नदृष्टांतात सांगितले स्वप्नदृष्टांतानुसार तो अक्कलकोटला आला श्री स्वामींभोवती दर्शनासाठी गर्दी झाली होती तेवढयात श्री स्वामींनी सेवेकर्यांस सांगितले त्या गोसाव्यास हात धरुन इकडे घेऊन या गर्दीला बाजूस सारुन सेवेकरी त्या गोसाव्यास श्री स्वामींपुढे घेऊन आला तो गोसावी श्री स्वामी महाराजास नमस्कार करुन त्यांच्या पुढे हात जोडून उभा राहिला श्री स्वामी महाराज त्यास म्हणाले काहो बैरागी बुवा द्वारकेस जाण्याची तुमची इच्छा आहे ना आणि द्वारकानाथाचे सगुण दर्शन तुम्हाला पाहिजे आहे ना असे म्हणता म्हणता श्री स्वामी महाराजांनी त्यांचे तेव्हाचे स्वरुप बदलून शंख चक्र गदा पद्म पीतांबर धारी गळा वैजयंतीमाळा चतुर्भुज श्यामवर्ण वगैरे श्री कृष्णमूर्ती त्या गोसाव्यास दिसू लागली तो चकित होऊन हे श्री कृष्णा हे द्वारकाधिशा हे रणछोडनाथ हे भगवान हे वैकुंठाधिपते मोठ्याने गर्जना करीत होता तेव्हा त्याच्या डोळ्यातून सारखे आनंदाश्र् वाहत होते तो देहभान विसरला होता जवळ जमा झालेल्यांना या दृष्याचे परम् आश्चर्य वाटले इतक्यात श्री स्वामी समर्थ महाराजांनी ते श्री कृष्ण रुप सोडून पूर्वरुप धारण केले तो गोसावीही देहभानावर आला तेथे जमलेल्या लोकांनी तेव्हा त्यास विचारले तुम्हास काय दिसले त्यावर त्याने उत्तर दिले अहो मला द्वारका धिशाची मूर्ती दिसली आणि त्या तेजात मी अगदी दिपून गेलो अहाहा काय ती मूर्ती आणि काय ते तेज.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या कथेतील गोसाव्यास जलोदर झालेला आहे म्हणून त्यास तीर्थयात्रा करता येणार नव्हती याचे त्यास दुःख आहे त्यास द्वारकेच्या श्री कृष्ण दर्शनाची तीव्र आस आहे त्याची अशी अवस्था असतानाच श्री स्वामी समर्थ त्याला स्वप्न दृष्टांत देऊन अक्कलकोटला येण्याची प्रेरणा देतात त्याला जलोदराची असलेली व्याधी म्हणजे पारमार्थिक दृष्टया त्याच्या साधनेच्या अंतिम टप्पातील हतबलता होती त्याचा सच्चेपणा श्री स्वामींनी जाणला होता म्हणूनच त्याला मोठया सन्मानाने सेवेकर्यांकरवी त्यांनी जवळ बोलविले आणि त्यास विचारले काहो बैरागीबुवा द्वारकेस जाण्याची तुमची इच्छा आहे ना आणि द्वारकानाथाचे सगुण दर्शन तुम्हाला पाहिजे आहे ना या लीलेत आलेल्या श्री स्वामींच्या या उदगाराने गोसाव्याच्या मनातला संशय पूर्ण विरुन गेला त्या गोसाव्याच्या मनात श्री कृष्णाचे जे स्वरुप ठसलेले होते तंतोतंत त्याच स्वरुपात त्यास श्री स्वामींनी दर्शन दिले म्हणूनच तो गोसावी मोठ्याने गर्जना करता झाला हे श्री कृष्णा हे द्वारकाधिशा हे रणछोडनाथ हे भगवान हे वैकुंठाधिपते त्या गोसाव्यास श्री स्वामी हे साक्षात भगवान श्री कृष्ण वाटले त्याच्या जिवाची श्री कृष्ण दर्शनाची तळमळ तगमग शांत झाली श्री स्वामी कधी कधी म्हणत मीच श्री कृष्ण होतो बरे याची प्रचिती येते ही लीला तेव्हाची असे समजून त्याकडे कानाडोळा करण्यात अर्थ नाही आजही निर्गुण निराकार स्वरुपात वावरणारे श्री स्वामी समर्थ या अशा लीलांची चिन्हे दाखवितात.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या