व्याधीमुक्त झालेल्या गोपाळराव केळकरांना श्री स्वामी समर्थ या एकमेव भगवंताची प्रचिती आली होती श्री स्वामींची दिव्य मूर्ती पाहून गोपाळबुवांनी त्यांच्या पायावर विनम्रपणे डोके ठेवीत ते म्हणाले महाराज कृपा करुन मला अनुग्रह द्यावा त्यावर श्री स्वामी म्हणाले अवकाश आहे .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

व्याधीमुक्त होऊन गोपाळबुवांना श्री स्वामी समर्थांच्या देवत्वाची पुरेपूर कल्पना आली होती श्री स्वामींकडून गुरुमंत्र मिळावा असे बुवास मनोमन वाटत होते परंतु श्री स्वामींकडून अनुग्रह मिळण्याचे चिन्ह काही दिसेना तसे गोपाळबुवा अस्वस्थ होत चालले होते परमार्थात घाई करुन चालत नाही हे तेव्हा गोपाळबुवांस उमगलेले नव्हते एका भगवंताशिवाय (श्री स्वामी समर्थांशिवाय ) अन्य कुणाचीही यापुढील आयुष्यात सेवा अथवा चाकरी करणार नाही अशी कठोर भीष्म प्रतिज्ञा गोपाळबुवांनी अगोदरच केलेली होती सर्वसाक्षी श्री स्वामींना बुवांच्या प्रतिज्ञेचा कसा विसर पडेल बुवांना अनुग्रह मिळविण्याची घाई झाली होती अनुग्रह मिळण्यास जसजसा उशीर होत चालला तसे गोपाळबुवा अस्वस्थ होत चालले पंधरा दिवसांनी श्री स्वामींनी बुवास स्वप्नदृष्टांत दिला तो मुळात बखरीतून वाचून मनन चिंतन करुन त्यातून बोध घेणेच उचित बुवांच्या त्या स्वप्नदृष्टांताचा मथितार्थ असा बुवांच्या उपासनेत विविध प्रकारे अडथळे येऊ शकतात पण गोपाळबुवांनी घाबरून जाऊ नये हे दर्शविण्यासाठी श्री स्वामी महाराजांनी बुवांस खांद्यावर उचलून आश्रय दिल्याचे सूचित केले आहे भिऊ नकोस मी पाठीशी आहे थोडक्यात काय तर परमार्थात पाय रोवून उभे राहावे लागते त्यासाठी दृढनिश्चय सातत्य आणि अव्यभिचारी निष्ठा असावी लागते उपास्य देव देवतेवर आणि स्वतःवरही ठाम विश्वास असावा लागतो बुवांच्यासारखी उपासनेत कितीही प्रतिकूलता येवो मनाची शरीराची कितीही कसोटी पाहिली जावो तरीही उपासनेतील दृढता ढळू देता कामा नये म्हणजे अनुग्रहिततेचा लाभ होतो हे अवकाश आहे या स्वामी समर्थ वचनावरुन कळते.

श्री स्वामी समर्थ 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या