त्या पोटशूळाचा उपद्रव असलेल्या ब्राम्हणाने सव्वा रुपयांच्या पेढ्यांचा नवस फेडला तो श्री स्वामी समर्थांच्या सेवेस राहिला एक दिवस त्याने श्री स्वामी महाराजांना विनवणी केली अहो कृपासागरा देवा आता ही पोटशूळाची इजा सोसवत नाही ह्याच्यापेक्षा मृत्यू फारच चांगला तर आता ह्या दीनावर कृपा करुन या व्याधीपासून सोडवावे अशी विनवणी करुन तो अक्षरशः गडबडा लोळू लागला त्याची ही अवस्था पाहून दयाघन श्री स्वामी त्यास म्हणाले अरे इकडे ये तुझे पोट किती दिवसापासून दुखते आहे त्यावर तो म्हणाला तेरा वर्षे झाली गुण नाही आता दीनाची उपेक्षा करु नका महाराजांनी त्यास पुढे बोलावून त्याच्या हातातील पितळेचा मुखवटा त्या पोटशूळ्या ब्राम्हणाच्या पोटाला लावला त्यासरशी त्याचा पोटशूळ गेला तो निखालस बरा झाला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

पोटशूळ्या ब्राम्हणास श्री स्वामी समर्थांच्या दैवी सामर्थ्यांचा प्रत्यक्ष अनुभव आला तो त्यांच्या सेवेत राहिला १३ वर्षे तो पोटशूळाचा त्रास सहन करीत होता त्याचेकडून धार्मिक आणि वैद्यकिय उपचार करुन झाले होते पण गुण आला नाही अखेरीस त्याच्या गुरुचरित्र पारायणाचे फलित म्हणून त्यास स्वप्नात दृष्टांत देण्याचे निमित्त करुन श्री स्वामींनी त्यास अक्कलकोटला आणले सव्वा रुपयाच्या पेढ्यांचा नैवेद्य आणि घोड्याचे दारातच अडून तटस्थ उभे राहणे या चमत्काराने त्यास श्री स्वामींच्या दैवी सामर्थ्याची पुरेपूर खात्री पटली चमत्काराशिवाय नमस्कार नाही या उक्तिनुसार तो आता स्वामी चरणी लीन होऊन त्यांच्या सेवेत राहिला ही लीला श्री स्वामी समर्थ सगुण स्वरुपात वावरत असताना घडली आता असा पोटशूळाचा अथवा पोटदुखीचा त्रास होत असल्यास श्री स्वामी समर्थ त्या ब्राह्यणासारखी आपल्यावर कृपा करतील का असा विचार मनात येणे साहजिकच आहे हो ते कृपा करतील पण त्यासाठी श्री स्वामींची निष्ठापूर्वक मनोभावे सेवा करावयास हवी आपण २१ व्या शतकात वावरतो आहोत तेव्हा श्री स्वामी उपासनेबरोबर तज्ञ डॉक्टरांनाही दाखवावयास हवे दोहोंच्या साहय्याने बरे होणे हाच व्यावहारिक अर्थबोध आहे निव्वळ तीर्थ भस्म अंगारे धुपारे याने काहीही होणार नाही श्री स्वामींच्या काळात वैद्यकीय सोई सुविधा नव्हत्या म्हणून तेच सर्वांचे धन्वंतरी होते हाही बोध व्हावा अशा साधकास उपासकास सेवेकर्यांस श्री स्वामी सतत दिलासा देतात भिऊ नकोस मी पाठीशी आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या