एका बाईचे डोळे पुष्कळ दिवस दुखत होते त्या बाईने श्री स्वामी समर्थ महाराजांस त्यावर उपाय विचारला तेव्हा त्यांनी तिला म्हशीचे मूत डोळ्यात घाल म्हणजे बरे होतील बाईने श्री स्वामींनी सांगितल्या नुसार तीन दिवस म्हशीचे मूत डोळ्यात घालताच तिचे डोळे चांगले बरे होऊन (डोळ्यातील) सारा वगैरे निघून गेला आणि तिला चांगले दिसू लागले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

वरील कथा भागातील स्त्री ही एक प्रापंचिक जीव आहे ती जेव्हा श्री स्वामी समर्थांकडे डोळ्याच्या दुखण्याबाबत विचारायला गेली तेव्हा वैद्यशास्त्र आताच्यासारखे प्रगत नव्हते शिवाय श्री स्वामींनी सांगितलेला उपाय हा मुलखावेगळा आणि विचित्र वाटतो परंतु श्री स्वामी हे सर्वसाक्षी अवतारी पुरुष होते त्यांनी सांगितलेल्या उपायांनी गुण हा येणारच परंतु या लीलेचा बोधार्थ शोधण्याचा प्रयत्न केल्यास असाही बोध मिळतो डोळे दुखत असलेल्या बाईने श्री स्वामींनी सुचविलेल्या म्हशीचे मूत डोळ्यात घालण्याचा उपचार तीन दिवस केल्यावर तिला चांगले स्वच्छ दिसू लागले परिणामी श्री स्वामींवरील तिचा विश्वास दृढ झाला म्हणूनच श्री स्वामी समर्थांची उपासना हा अनुभूतीचा मार्ग आहे असे खात्रीपूर्वक सांगितले जाते या लीलाकथा भागातील म्हैस ही परमार्थाच्या दृष्टीने माया आहे मूत्र म्हणजे शरीरातील टाकाऊ आणि एक प्रकारचा विषारी द्रव पदार्थ परंतु शिवांबू शास्त्राने मूत्रास औषधी मानले आहे परंतु येथे म्हशीचे मूत याचा अर्थ माया ममता कामना यातून निर्माण होणारे विविध प्रकारचे विषय आणि विकार होत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षडरिपू म्हणजे म्हशीच्या मूत्रातील विषारी घटक पदार्थच आहेत ते मानवी मनात आणि शरीरात पसरल्यास (येथे डोळे दुखणारी बाई हे उदाहरण आहे) सर्व सामान्य व्यक्तीच्या दृष्टीवर मोह माया ममतेचा सारा (पडदा) येऊन व्यक्ती कमालीची आत्मकेंद्रित होते जीवनाच्या अथपासून तर अंतापर्यंत मी आणि माझे या पलीकडेही सत्यम शिवम सुंदरम आहे हे दिसेनासे होते या लीलाकथेत तीन दिवस उपचार केल्याचा उल्लेख आहे हे तीन दिवस म्हणजे तीन टप्पे ते
१)परमार्थ भक्ती उपासना याचा स्वीकार करणे
२)साधू संत सज्जन यांचा सत्संग अथवा सहवास हे न जमल्यास चांगल्या सकस आणि व्यापक विचाराचे वाचन मनन आणि चिंतन करणे
३)श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासि सदा लवावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलावे असे केल्यास कुणाचाही दृष्टीचा अज्ञानाचा पडदा दूर होऊन ज्ञान दृष्टी प्राप्त होईल हाच यातला महत्त्वाचा बोध आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या