एकदा दत्तजयंतीच्या दिवशी चोळाप्पा श्रीपाद भट केशव देशपांडे हे श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करु लागले की महाराज आज प्रसादास गर्दी फार झाली तीनशे मनुष्यापुरतेच अन्न शिजले आहे त्यात हे तीन चार हजार यात्रेकरू कसे जेवतील समर्थ म्हणाले हे कडे आणि हा जगदंबेचा टाक घ्या व पोळ्यांच्या राशीत टाका काळजी करु नका मग देशपांड्यांनी कडे व टाक पोळ्यांच्या राशीत ठेवले नंतर मोठ्या थाटाने अंबेची आरती केली श्रीफळ फोडून अन्नावर तीर्थ सिंचन केले व वाटण्यास सुरूवात केली पहिली पंगत दोन हजाराची झाली दुसरी एक हजाराची झाली तिसरी मुसलमान हरिजन इ.लोकांची एक हजाराची बसली कोणीही विना प्रसादाचे राहिले नाही सर्वांनीच श्री स्वामी समर्थ नामाचा जयजयकार केला नंतर महाराज म्हणाले अरे कडे आणि टाक इकडे आणा श्री स्वामींचे हे वाक्य ऐकून देशपांड्यांनी कडे व टाक श्री स्वामींपुढे आणून ठेवले नंतर महाराजांचे भोजन झाले रात्री कीर्तन गायन वगैरे होऊन जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलेत दत्तजयंतीसाठी तीनशे माणसांचा प्रसाद तयार करण्यात आला होता गर्दी उसळून ती तीन चार हजार माणसांपर्यंत गेली होती इतक्या सर्वांना ते अन्न (प्रसाद) कसे पुरणार ही चिंता चोळाप्पा श्रीपाद भट केशव देशपांडे यांना पडली होती पण श्री स्वामींनी त्या सर्वांना कडे आणि जगदंबेचा टाक पोळ्यांच्या राशीत टाकण्यास सांगून निश्चित राहण्यास सांगितले हे सर्व कशाच्या भरवशावर तर श्री स्वामी समर्थांना रिद्धी सिद्धी वश झालेल्या होत्या या प्रसंगात त्यांनी मनःसंकल्पाने अन्नवृद्धी घडविली त्यात चार हजार लोक जेवून तृप्त झाले त्यांनी हातातील कडे आणि जगदंबेचा टाक त्या सिद्धान्नावर ठेवून पूजा आरती आणि श्रीफळ फोडून त्या अन्नावर तीर्थ सिंचन केले हा केवळ तेथे असलेल्या सेवेकर्यांचा आणि जमलेल्या लोकांचा भक्तिभाव जागवण्यासाठी केलेला एक धार्मिक वाटणारा उपचार होता लोकांची श्रद्धा वाढावी यासाठी असे काही धार्मिक विधी करावे लागतात परंतु या प्रसंगातले कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व काही श्री स्वामी समर्थ हेच होते तीनशे पात्रांच्या अन्नात चार हजार माणसे जेवू घालण्याची लीला श्री स्वामी समर्थांनी करुनही त्याचे सर्व श्रेय त्यांनी जगदंबा मातेला दिले आणि स्वतः मात्र नामानिराळे राहिले तिसऱ्या पंक्तीत मुसलमान हरिजन इ.लोक जेवल्याच्या उल्लेखावरुन त्याही काळी त्यांची सर्वसमावेषकता बोधित होते सर्वांचे जेवण आटोपल्या नंतरच महाराजांचे भोजन झाले हे सर्वच विचार करावयास लावणारे आणि आत्मबोध करुन देणारे आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या