श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये कायम ठिय्या देऊन कधीच राहत नसत आसपासच्या खेड्यापाड्यात त्यांची सतत भ्रमंती चालूच असे खेडमपूरहून नागणसुरास आले तेथून दुसरे दिवशी वाडी गावी आले त्या ठिकाणी धान्य वगैरे काही मिळेना दोन प्रहरी बाजरी भरडून सेवेकर्यांनी खाल्ली भाजीसुध्दा मिळाली नाही येथे खावयास काहीच मिळणार नाही अशा साशंकतेने सेवेकरी श्री स्वामींस प्रार्थना करु लागले महाराज येथे खाण्यास काहीच मिळत नाही तर अक्कलकोटास चलावे अनेकांनी श्री स्वामींना विनवले परंतु ते कुणाचेही ऐकेनात सर्वच निराश झाले महादेवभटाने श्री स्वामीस कळवून विचारले उद्याही आम्हाला उपास आहे का त्यावर श्री स्वामी हसत हसत उत्तरले उपास का करता तूप गूळ पुष्कळ घ्या गांड फाटेपर्यंत खा दुसऱ्या दिवशी केज धारुरचे महारुद्रराव देशपांडे कुटुंबासह यात्रेस आले दीडशे सेवेकर्यांची खाण्याची व्यवस्था होईल इतका शिधा सामग्री घेऊन ते आले श्री स्वामींना मंगलस्नान घालून षोडशोपचारे पूजा आरती करुन पात्रे वाढली सर्वांची यथेच्छ भोजने झाली .अर्थ - भावार्थ - मथितार्थ

श्री स्वामी समर्थांचे वागणे बोलणे चालणे सारेच काही अगम्य आणि अतक्य असल्याचे याही लीलेत दिसते पण ते सर्व उद्देशपूर्ण होते त्यांचे सहज बोलणे तो उपदेश सहज चालणे तो आदेश सहज खेळणे तो निर्देश असे या लीलेतील श्री स्वामींचा दीडशे सेवेकर्यांसह खेड्मपूर नागणसूर वाडी हा प्रवास त्या सर्वांना ते ग्रामीण भागातून फिरवित होते त्या सर्व सेवेकर्यांची दमछाक उपासमार होत होती अक्कलकोटला परतण्यासाठी ते श्री स्वामीस आर्जवे विनंत्या करीत होते या सर्वच घटनांची उकल करुन त्यातील बोध समजावून घेतला पाहिजे कोणतीही उपासना साधना ही काया वाचा मनाच्या शुद्धतेसाठी असते तशी ती असावी सुरुवातीस सारेच जड जाते श्री स्वामींनी त्यांची दमछाक उपासमार करुन त्यांच्या साधनेची बैठक पक्की केली उपासना साधना करताना वृत्तीत होणारी अस्वस्थता घायकुतेपणा १५० सेवेकर्यांच्या स्थितीतून जाणवतो परंतु ते सेवेकर्यांकडून ही पूर्वतयारी करुन घेत असल्याचे दिसते त्या सर्वांना तो सर्व त्रास उपासमार दमछाक नकोनको होते अशा स्थितीत श्री स्वामी त्यांना सांगतात उपास का करता तूप गूळ पुष्कळ खा पोटभर खा यातून श्री स्वामींना हेच सूचित करावयाचे आहे की कठोर उपासना करा अंतिमत आनंद सुख समाधान मिळणारच आहे पण आम्हाला सर्व सहज प्राप्त व्हावे असे वाटते अध्यात्मात तपाचा खूप खोल अर्थ आहे हा व्यापक अर्थ समजून घेतला तशी कृती केली तर उपासमार न होता तृप्ततेचा आणि आनंदाचा भरपूर तूप गूळ खावयास मिळेल यात शंकाच नाही .

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दत्तप्रबोधिनी चँनेल पार्टनरशीप संबंधित पोस्टस्

योग साधना विशेष संबंधित पोस्टस्

आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्

देवी उपासना संबंधित पोस्टस्

पारायण पाठ व नामस्मरण संबंधित पोस्टस्


त्राटक विद्या संबंधित पोस्टस्

वास्तुशास्त्र संबंधित पोस्टस्

अंकशास्त्र संबंधित पोस्टस्

पितृदोष संबंधित पोस्टस्

दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रमGET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीतीAll about Swami Samarth, Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top. - Visit Website Here !


Embed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या